शहरं
Join us  
Trending Stories
1
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
2
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
3
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
4
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
5
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
6
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
7
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
8
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
10
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
11
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत
12
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
13
VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
14
IND vs NZ : भारताची लाजिरवाणी कामगिरी; रोहितकडून मोठ्या चुकीची प्रामाणिक कबुली, म्हणाला...
15
'मिट्टी में मिला देंगे...', 'योगी'राजमध्ये आतापर्यंत किती गुन्हेगारांचा एन्काउंटर? पाहा आकडेवारी
16
"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले
17
मविआत २६० जागांचा तिढा सुटला, २८ जागांवर प्रचंड रस्सीखेच; आजच जागावाटप फायनल होणार?
18
"लाडक्या बहिणींना मदत करताना जाहिरातबाजी आणि चमकोगिरीची गरज काय?", काँग्रेसचा सवाल
19
भारतात लवकरच Flying Taxi सर्व्हिस सुरू होणार, जाणून घ्या किती असेल भाडे?
20
"रोहितसाठी 'ही' चिंतेची बाब; कोहलीने 'हा' मोह टाळावा"; मुंबईकर माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत 

निवडणुकीसाठीचा प्रचार थंडावला

By admin | Published: October 12, 2016 4:49 AM

मुरुड नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे महिला खुला प्रवर्गासाठी पडले असून सुद्धा कोणत्याही राजकीय पक्षाने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी शिक्कमोर्तब

नांदगाव /मुरुड : मुरुड नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे महिला खुला प्रवर्गासाठी पडले असून सुद्धा कोणत्याही राजकीय पक्षाने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी शिक्कमोर्तब न केल्याने सर्वच पक्षातील उमेदवार चिंताग्रस्त झालेले आहेत. आरक्षण पडल्यावर त्वरित सर्व पक्ष निवडणुकीच्या कामासाठी सज्ज होतील असा अंदाज होता परंतु नक्की तिकीट कोणाला व कोणाच्या नावावर शिक्कमोर्तब हे निश्चित न झाल्याने सर्वच पक्षांचा प्रचार थंडावला आहे. तुरळक गाठी भेटी यावरच सद्या जोर देताना काही उमेदवार दिसत आहेत. तसेच नगरसेवक पदाची यादी येऊन पडली आहे. परंतु ती सुद्धा नावे अधिकृत जाहीर न केल्याने उमेदवार प्रचार करताना धजावत आहेत. मुरु ड नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शेतकरी कामगार पक्ष यांची युती मानली जात आहे. परंतु दोन्ही पक्ष जोपर्यंत आमने-सामने न बसल्याने जागावाटप गणित न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये बैचैनी दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांच्या पत्नी मुग्धा दांडेकर यांचे नाव चर्चेत आहे. सोमवारी १७ आॅक्टोबर रोजी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. त्यामध्ये आमदार सुनिल तटकरे हे या नावाची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे असे विश्वसनियरित्या कळते. तर शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी चार महिला उत्सुक असल्याचे प्रतिपादन शिवसेना शहर अध्यक्ष्य प्रमोद भायदे यांनी केल्याने नक्की माळ कोणच्या गळ्यात पडणार हा प्रश्न सर्वसामान्य मतदाराला पडला आहे. भारतीय जनता पार्टी मुरु ड नगरपरिषद निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याची माहिती शहर अध्यक्ष्य प्रवीण बैकर यांनी दिली आहे. आमच्याकडे सुद्धा १७ उमेदवार व नगराध्यक्षपदाचा उमेदवारांची यादी प्रतीक्षेत असून शिवसेनेसोबत योग्य ती तडजोड व जागावाटप बोलणी झाली तरच आमची ही निवडणूक युती मधून लढवू अन्यथा आमचा पर्याय खुला असेल आमच्याकडून निवडणूक लढवण्यास अनेक जण उत्सुक असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. काँग्रेसआय पक्षाचे तालुका अध्यक्ष सुभाष महाडिक यांना नगरपरिषद निवडणुकी संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले नगरपरिषद निवडणुकीत आम्ही १७ पैकी १५ जागा लढवणार आहोत. नगराध्यक्षपदाचा उमेदवार सुद्धा तयार आहे. जिल्हा काँग्रेस बैठकीत समविचारी पक्षसोबत युती करू शकतो. परंतु कोणत्याही पक्षाकडून तशी विचारणा न झाल्याने आम्ही तयारी पूर्ण केली आहे. शेकाप हा राष्ट्रवादीसोबत युती करणार असे स्पष्ट दिसत आहे परंतु वरिष्ठांची अद्याप बैठक न झाल्याने ही फक्त चर्चाच ऐकिवात आहे. निवडणूक तोंडावर आलेली असूनसुद्धा युती संदर्भात व जागा वाटप तिढा न सुटल्याने ही गणिते अनुत्तरित आहेत. (वार्ताहर)