अलिबाग : अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम २००६ अंतर्गत दळी जमिनी अंतर्गत वनहक्क प्रकरणांचा निपटारा जलद गतीने करु न आदिवासी बांधवांना त्यांचे पारंपारिक हक्क प्रदान करण्यासाठी रायगड जिल्ह्यात २१ जुलै ते ३१ आॅगस्ट दरम्यान विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ३१आॅगस्ट २०१५ पर्यंत ही कार्यवाही पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यासाठी सर्व संबंधितांनी आपले वनहक्क दावे वनहक्क समीती वा ग्रामसभेकडे दाखल करावेत असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी केले आहे.रायगड जिल्ह्यामध्ये ५ हजार ३९८ दळी जमीन धारक आहेत. त्यामुळे मान्य करण्यात आलेले व दाखल झालेले वनहक्क दावे हे प्रमाण कमी आहे. त्याकरीता या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मोहीम अधिक गतिमानता करण्यासाठी कालबध्द आराखडा तयार करण्यात आला असून त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित उपविभागीय अधिकारी, उप वनसंरक्षक, तहसिलदार, गट विकास अधिकारी, पंचायत समतिी, ग्रामपंचायत स्तरावर निर्देश देण्यात आले आहेत.दळी जमिनी अंतर्गत वनहक्क प्रस्ताव प्राप्त करु न घेण्यासाठी विशेष मोहिमेअंतर्गत दळी प्लॉट, दळी धारक निश्चित करण्यापासून ते संबंधित जिल्हास्तरीय समातीकडे मान्यतेसाठी सादर करण्यासाठी दि.२० जुलै ते ३१आॅगस्ट २०१५ असा कालबध्द कार्यक्र म आखण्यात आलेला आहे. या कालबाह्य कार्यक्र मातंर्गत दळी धारकांची यादी तयार करण्याच्या कार्यवाही २७ जुलै पर्यंत तर दवंडी देणे तसेच यादीची प्रसिध्दी करणे २८ जुलै. दावा अर्ज भरु न घेण्यासाठी ३ आॅगस्ट ही मुदत आहे. तद्नंतर गाव पातळीवर तपासणी पुर्ण करण्याची मुदत ६ आॅगस्ट अशी राहिल. अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांचे मान्यता) अधिनियम २००६ अंतर्गत अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी यांनी याकामी संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समीती किंवा तहसिलदार यांच्याकडे अधिक माहितीसाठी संपर्क साधावा आणि आपले दळी जमिनी अंतर्गत वनहक्क दावे संबंधित वनहक्क समीती, ग्रामसभेकडे दाखल करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी केले आहे.
आदिवासींच्या हक्कासाठी मोहीम
By admin | Published: July 21, 2015 4:52 AM