इंटरसिटीच्या वेगासाठी कर्जतचा थांबा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:44 PM2019-06-03T23:44:38+5:302019-06-03T23:44:44+5:30
तीव्र नाराजी : कर्जतहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय; कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचा विरोध
कर्जत : मुंबई-पुणे मध्य रेल्वे मार्गावर धावणाºया इंटरसिटी एक्स्प्रेच्या गतीत वाढ करून अर्ध्या तासाची बचत करण्यासाठी पुश पूल तांत्रिक पद्धतींचा अवलंब करत रेल्वे प्रशासनाने कर्जत रेल्वेस्थानकातील थांबा रद्द करून थेट लोणावळ्यात थांबा देण्यात आला आहे. यामुळे पुण्याला जाणाºया प्रवाशांच्या अर्ध्या तासाची बचत जरी होणार असली तरी कर्जतहून पुण्याला जाणाºया प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होणार आहे. यामुळे कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने विरोध केला आहे.
मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यासाठी पुश पूल पद्धतीने चाचणी घेण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला असून त्याची चाचणी शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कर्जत रेल्वेस्थानकात सकाळी ८.१२ मि. थांबणारी इंटरसिटी एक्स्प्रेस थांबली नाही. मात्र, तिचा वेग काहीसा मंदावला होता त्याचा फायदा घेत काही प्रवाशांनी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे पोलिसांनी त्यांना त्यापासून परावृत्त केले.
मध्य रेल्वे प्रशासनाने ३१ मेपासून मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस या गाडीची पुणे रेल्वेस्थानकात पोहोचण्याची वेळ ४० ते ४५ मिनिटे कमी करण्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथुनच पुश पूल इंजिन लावून गाडी चालविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई ते पुणे हे अंतर केवळ सुमारे दोन तास ३५ मिनिटांत पार करण्याची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी सुरू केली आहे. मात्र, हा निर्णय घेण्याअगोदर मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवाशांनाही विचारात घेणे गरजेचे होते, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
कर्जत रेल्वे स्थानकातून मुंबई दिशेकडे जाण्याकरिता उपनगरीय लोकलची जशी सुविधा आहे, तशी पुणे दिशेकडे जाण्याकरिता नाममात्र मेल एक्स्प्रेस गाड्यांशिवाय इतर कुठलीही सुविधा नाही. तसेच कल्याण व कर्जत रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या सर्व रेल्वे स्थानकातील रेल्वे प्रवाशांना पुणे दिशेकडे जाण्याकरिता कर्जत रेल्वे स्थानकात येऊन मेल एक्स्प्रेस गाड्या पकडाव्या लागतात. सकाळी इंद्रायणी एक्स्प्रेसनंतर एक तासाने असलेल्या इंटरसिटी एक्स्प्रेसने अनेक नियमित जाणारे रेल्वे प्रवासी प्रवास करत असतात. इंटरसिटी एक्स्प्रेसनंतर पुन्हा अर्धा-पाऊण तासाने डेक्कन एक्स्प्रेस शिवाय पुण्याकडे जाण्यासाठी दुसरी गाडीच नाही. लोणावळा, खंडाळा, पिंपरी, चिंचवड इत्यादी ठिकाणी असलेल्या शासकीय व खासगी कार्यालयात पोहोचण्याकरिता कर्जत रेल्वे स्थानकात इंटरसिटी एक्स्प्रेसला थांबा असणे गरजेचे आहे. जर इंटरसिटी एक्स्प्रेसला कर्जत रेल्वे स्थानकात थांबा दिला जात नसेल, तर मध्य रेल्वे प्रशासनाने पर्यायी रेल्वेसेवा द्यावी.
कर्जत-लोणावळा, कल्याण-लोणावळा, पनवेल-लोणावळा ह्या मार्गांवर शटल सेवा सुरू कराव्यात. मध्य रेल्वेच्या प्रशासनाने या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. मुळातच कर्जत लोणावळा पुणेकडे जाणाºया एक्स्प्रेस शिवाय पर्याय नाही. लोकल सेवाही नाही, त्यामुळे या निर्णयाचा कर्जतहून पुण्याला जाणाºया कामगार, व्यापारी यांना या गैरसोयीचा फटका बसत आहे. - प्रभाकर गंगावणे, सचिव, रेल्वे पॅसेंजर असोसिएशन
कर्जतहून पुण्याकडे जाणाºया गाड्यांचे प्रमाण कमी आहे, त्यात आता रेल्वे प्रशासनाने इंटरसिटी गाडीचा कर्जत टेक्निकल थांबा रद्द केला आहे, त्याबाबतची ट्रायल चालू आहे तरी हा थांबा रद्द करू नये, पूर्वी होती तशीच सुविधा असावी याबाबाबत रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. वेळ प्रसंगी रेल्वेचे जनरल मॅनेजर व रेल्वेमंत्री यांची भेट घेणार आहे. - पंकज ओसवाल, सामाजिक कार्यकर्ते