कार-बसची धडक; एक ठार, चार जखमी, महाड तालुक्यातील दासगावच्या हद्दीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 03:22 AM2020-12-21T03:22:29+5:302020-12-21T03:22:55+5:30

Accident : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव हद्दीत रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास देवगड ते मुंबई जाणारी मारुती कार ही मुंबई ते गुहागर जाणाऱ्या एका खासगी बसवर समोरून आदळली

Car-bus collision; One killed, four injured in Dasgaon incident in Mahad taluka | कार-बसची धडक; एक ठार, चार जखमी, महाड तालुक्यातील दासगावच्या हद्दीतील घटना

कार-बसची धडक; एक ठार, चार जखमी, महाड तालुक्यातील दासगावच्या हद्दीतील घटना

googlenewsNext

दासगाव : महाड तालुक्यातील दासगाव हद्दीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एका खासगी बसवर एक मारुती कार समोरून आदळून झालेल्या अपघातामध्ये कारचालक ठार झाला.
 तर अन्य चार प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये एक वर्षाच्या लहान मुलाचाही समावेश आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव हद्दीत रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास देवगड ते मुंबई जाणारी मारुती कार ही मुंबई ते गुहागर जाणाऱ्या एका खासगी बसवर समोरून आदळली
अपघातानंतर कारच्या समोरचा अर्धा भाग बसखाली गेला. या अपघातामध्ये कारचालक संतोष सहदेव रुपये (रा. निमतवाडी, देवगड) हा जागीच ठार झाला. कारमधील नरेश सुभाष चव्हाण (३१), तन्वी नरेश चव्हाण (३१), दूर्वा नरेश चव्हाण (४), गिरीश नरेश चव्हाण (१) सर्व राहणार शिरगाव, देवगड हे चार प्रवासी जखमी झाले.
सर्व जखमींना पुढील उपचारासाठी  चिपळूण येथे हलवण्यात आले आहे. अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस नाईक आर.पी. नागे हे करीत आहेत.

Web Title: Car-bus collision; One killed, four injured in Dasgaon incident in Mahad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात