आंबेनळी घाटात ५० फूट खोल दरीत कार कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 06:14 AM2018-10-21T06:14:01+5:302018-10-21T06:14:03+5:30

रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमाभागामध्ये असलेल्या आंबेनळी घाटामध्ये शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास महाबळेश्वरकडे जाणारी कार दाभिळ गावालगतच्या दरीमध्ये कोसळली.

The car collapsed in a 50-feet deep graveyard | आंबेनळी घाटात ५० फूट खोल दरीत कार कोसळली

आंबेनळी घाटात ५० फूट खोल दरीत कार कोसळली

googlenewsNext

पोलादपूर : रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमाभागामध्ये असलेल्या आंबेनळी घाटामध्ये शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास महाबळेश्वरकडे जाणारी कार दाभिळ गावालगतच्या दरीमध्ये कोसळली. या अपघातात प्रशांत राजेंद्र सस्ते (२७, रा. मोशी भोसरी, पुणे) हा चालक जखमी झाला. त्याला उपचारासाठी सह्याद्री ट्रेकर्सच्या मदतीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. पोलादपूर हद्दीत आंबेनळी घाटातील बावली-दाभिळ गावालगत प्रशांत सस्ते या चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळली. अपघातावेळी सस्ते कारमधून बाहेर फेकले गेले, तर कार दरीतील एका झाडाला अडकली. पाठीमागून येणाऱ्या एका कारचालकाच्या ही घटना निदर्शनास येताच त्याने तातडीने प्रतापगड व
वाडा कुंभरोशी येथील नागरिकांना अपघाताची माहिती दिली.
यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन चालक सस्ते याला दरीतून बाहेर काढले.

Web Title: The car collapsed in a 50-feet deep graveyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.