शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

कार ६० फूट दरीत कोसळली

By admin | Published: September 28, 2016 2:46 AM

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात क्वालिस कार सुमारे ६० फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात एक तरुणी ठार झाली, तर तिघे जखमी झाल्याची घटना येलंगेवाडी

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात क्वालिस कार सुमारे ६० फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात एक तरुणी ठार झाली, तर तिघे जखमी झाल्याची घटना येलंगेवाडी गावच्या हद्दीत मंगळवार रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी गेलेले पर्यटक मुंबईकडे परतत असताना एका अवघड वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून हा अपघात घडला. क्वालिस चालक शशिकांत भुवड (३०, रा. सांताक्रुझ) मुंबई हा आपल्या ताब्यातील कार (एमएच ०४ बीएन ५०८५) घेवून गणपतीपुळे ते मुंबई असे जात होते. कशेडी घाटात येलंगेवाडी गाव हद्दीत आला असता अवघड वळणावर गाडीवरील ताबा सुटून क्वालिस सुमारे ६० फूट दरीत कोसळली. या अपघातात चेतमा दोडिंया ही १८ वर्षे वयाची तरुणी डोक्याला जबरदस्त मार लागून जागीच ठार झाली. तर बाळकृष्ण सणस (४६), छाया वाडिया (४२), चालक शशिकांत भुवड यांना मुका मार लागून जखमी झाले आहेत. तर प्रिया भावेन (२३), नीता दोडिंया यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पो. उपनिरीक्षक अनिल अंधेरे, एएसआय मोरे, पो. ह. पिंगळे, पो. ह. खाडे यांनी ही ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.आपद्ग्रस्तांना मदतघटनेची माहिती कशेडी महामार्ग पोलिसांना समजताच पो. ह. क्षीरसागर, धुमाळ, झगडे, हसबे, बारगुडे, पोलीस मित्र महेश रांगडे यांनी जगत्गुरू स्वामी नरेंद्र महाराज रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेवून सर्व आपद्ग्रस्तांना दरीतून वरती काढून जखमींना त्वरित पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.