अलिबाग : बेदरकारपणे वाहन चालविण्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मारुती ओमनी व ट्रक यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार, तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.शुक्रवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास मारु ती ओमनी (एमएच-१२/पीएच-४४०५) पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेने जात असताना, खोपोलीजवळच्या आडोशी गावाजवळ ट्रकने पाठीमागून ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात, आनंद बाबू शिंदे (२२, रा. भोसलेवाडी-पुणे) यांचा मृत्यू झाला, तर ओमनी कार चालकासह नितीन नामदेव शिंदे, राज शंकर डोके, सलमान निजाम सय्यद, सचिन प्रभाकर कांबळे (सर्व रा. भोसलेवाडी-पुणे), हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खोपोली नगरपालिका रुग्णालयात औषधोपचार चालू आहेत. अपघात प्रकरणी खोपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.गोवा राष्ट्रीय महामार्गावर कारला अपघात, सहा जखमीशुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळच्या कशेणे गावच्या हद्दीत एसटी बस (एमएच-०६/एडब्ल्यू-६२६५)वर मुंबईकडून येणारी आल्टो कार (एमएच-४६/एएल-५५९५) आदळल्याने झालेल्या अपघातात, कारचालकासह ममता श्रीकांत चांदोरकर, स्वर श्रीकांत चांदोरकर, राधाकृष्ण अय्यर, ज्योती राधाकृष्ण अय्यर, अरु ण राधाकृष्ण अय्यर हे सहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर माणगाव उपजिल्हा रु ग्णालय व अन्य खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. माणगाव पोलिसांनी या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोटारसायकल अपघात; एक जखमीमुंबई-गोवा हायवेने जात असताना, महाडजवळच्या केंबुर्ली गावाजवळ रस्त्यावरील वाळूमिश्रित खडीवरून दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. त्यांच्यावर महाड ग्रामीण रु ग्णालयात औषधोपचार चालू आहेत. याबाबत महाड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर कारला ट्रकची धडक, अपघातात एक ठार; पाच जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 6:14 AM