गणेश प्रभाळे/संजय करडे दिघी : ‘क्यार’ या चक्रिवादळाचा तडाखा श्रीवर्धनमधील किनारपट्टीला बसला आहे. दिघी खाडीतून होणारी दिघी-आगरदांडा ही जलवाहतूक उशिरा सुरू आहे. ‘क्यार’ वादळाचा ऐन दिवाळीत श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला मोठा फटका बसला असून समुद्रकिनारी सध्या शुकशुकाट दिसत आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यावसायिकांना रोजगार मिळवण्यासाठी हाच कालावधी महत्त्वाचा असतो. दिवाळीमध्ये पर्यटन हळूहळू वाढू लागते. मुंबई, पुणे, साताराहून येणारे पर्यटक दिघी जंगलजेटी मार्गे फेरी बोटीने येतात. यामुळे श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर अशा विस्तीर्ण समुद्रकिनाºयाला पर्यटकांची चांगलीच पसंती राहते. सध्या ‘क्यार’ वादळाचा फटका तालुक्यातील पर्यटनाला बसला आहे. शिवाय, गुरुवारपासून दिवसा व रात्री पावसाच्या हलक्या सरी पडल्या. शनिवारी दिवसभर वातावरण ढगाळ होते. पुढे अवकाळी पावसामुळे भातशेती तसेच कडधान्ये पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या वर्षी गणेशोत्सवात झालेली अतिवृष्टी व सध्याच्या दिवाळी उत्सवात पडणाºया पावसामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.
सद्या वादळाची दिशा बदली असल्याची माहिती श्रीवर्धन प्रशासनाकडून देण्यात आली. श्रीवर्धन तालुक्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. क्यार वादळामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी घेत असल्याचे दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक शेलार यांनी सांगितले. क्यार चक्रिवादळामुळे झालेल्या हवामानातील बदलामुळे, वादळी वाºयामुळे दिघी ते आगरदांडा ही प्रवासी वाहतूक उशिरा सुरू असल्याची माहिती दिघी बंदर निरीक्षक प्रकाश गुंजाळ यांनी दिली.वादळामुळे नौका तीन दिवस दिघी बंदराच्या आश्रयाला१) खोल समुद्रात मासेमारीसाठी आलेल्या मच्छीमारांनी गुरुवार सायंकाळी वादळापासून सुरक्षिततेसाठी श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदराच्या खाडीत आश्रय घेतला आहे. या वेळच्या बदलत्या वातावरणामुळे मासेमारी व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. यंदाची मासेमारीची सुरुवात मोठ्या कालावधीने रडतखडत सुरू झाली. आता अचानक वादळी वाºयाचे संकट आल्याने अनेक जिल्ह्यांतील मच्छीमार नौका दिघी खाडीकिनाºयालगत विसावल्या आहेत. पावसामुळे व बदलत्या हवामानामुळे समुद्रातील माशांचे प्रमाण कमी झाले असून त्यामुळे मच्छीमारी व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असल्याची भावना याप्रसंगी मच्छीमारांनी व्यक्त केली.प्रशासनाची सतर्कता
२) श्रीवर्धन तहसील व दिघी सागरी पोलीस ठाण्याकडून दिघी बंदर परिसरात मच्छीमारांची भेट घेण्यात आली. क्यार वादळामुळे व समुद्रातील संभाव्य भीतीमुळे इतर राज्ये तसेच जिल्ह्यातील मासेमारी करणाºया बोटी दिघी किनारी लागल्या असल्याने श्रीवर्धन तहसीलकडून या बोटींवरील खलाशांसाठी औषधे व टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा करण्यात आला. या वेळी दिघी बंदर येथे तहसीलदार सचिन गोसावी, दिघी सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक एम. आर. शेलार, पोलीस कर्मचारी संदीप चव्हाण, मंडळ अधिकारी सुनील मोरे, तलाठी सोरे, आरोग्यसेवक कासारे व कोतवाल गणेश महाडिक उपस्थित होते.व्यावसायिकांचा दिवाळी हंगाम गेला वायारायगड हा पर्यटनाचा जिल्हा आहे, त्यामुळे येथे पर्यटकांची वर्दळ असते, त्यात दिवाळी आणि उन्हाळी सुट्टींमध्ये मोठी गर्दी येथे असते. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय या हंगामात जोरात असतो. मात्र, क्यार वादळ आणि पाऊसाचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांची पंचायत झाली आहे.चिंता वाढलीयंदा जिल्ह्यात झालेल्या विक्रमी पावसाचा सर्वाधिक फटका हा शेतकºयांना बसला आहे. त्यात पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याने चिंता वाढली आहे.