चांदईजवळील रस्त्याचा भराव गेला वाहून; रस्त्याकडेला वाढले गवत, अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 03:55 AM2017-11-04T03:55:28+5:302017-11-04T03:55:46+5:30
तालुक्यातील चिंचवलीकडून कडावकडे आणि पुढे तांबस मार्गे दहिवली-कर्जत या राज्यमार्गावर चांदई गावाच्या परिसरात रस्त्याचा काही भराव पावसामुळे खचला व काही भाग वाहून गेला आहे.
कर्जत : तालुक्यातील चिंचवलीकडून कडावकडे आणि पुढे तांबस मार्गे दहिवली-कर्जत या राज्यमार्गावर चांदई गावाच्या परिसरात रस्त्याचा काही भराव पावसामुळे खचला व काही भाग वाहून गेला आहे. या भागात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असल्याने वाहनांना या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
आठ वर्षांपूर्वी कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाने कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर चिंचवली गावाजवळून कडावकडे जाणारा रस्ता राज्यमार्गात वर्ग केला. त्या रस्त्याचे रुंदीकरण केले असून, अनेक ठिकाणी हा रस्ता अरुं द आहे. बहुतेक ठिकाणी जुन्या पाइप-मोºया न बदलता केवळ त्या ठिकाणी सिमेंटचे कठडे बांधण्यात आले. मात्र, पावसात या राज्यमार्ग नाव असलेल्या रस्त्यावर चांदई
गावाच्या परिसरात मोठे भगदाड पडले आहे.
चिंचवली गावाकडून जाताना लागणाºया प्राथमिक शाळेच्या पुढे हे भगदाड रस्त्याच्या डाव्या बाजूला पडले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता ही त्या संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या गवतामुळे निर्माण झाली आहे. त्या गवताने अर्धा रस्ता व्यापला असून, वळणावर समोरून येणारी वाहनेदेखील दिसत नाहीत. मात्र, ज्या ठिकाणी रस्त्याचा भराव वाहून गेला आहे, त्या ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जाणारा नालादेखील आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाºया वाहनांनी अगदी त्याच ठिकाणी गवतातून आपले वाहन नेल्यास त्यांचे वाहन थेट नाल्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रस्त्यावर पडलेल्या त्या भगदाड आणि वाहून गेलेल्या भरावाबाबत स्थानिक ग्रामस्थ आणि रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या सहारा कोळंबे यांनी कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना केली होती. पावसाळा अर्ध्यावर असताना केलेली सूचना पावसाळा संपून गेला तरी त्यावर कार्यवाही झाली नाही. त्याबाबत जिल्हा परिषद सदस्या कोळंबे यांनी संताप व्यक्त केला
आहे.
त्या ठिकाणी मातीचा भराव टाकून दुरु स्ती करण्याचे काम करता येत नसेल तर किमान रस्त्यावर अपघाताचा धोका आहे, याची माहिती देणारा फलक किंवा त्या ठिकाणी चुना दगडांना रंगवून सूचना देण्याची तसदी देखील कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाने आजपर्यंत घेतली नाही.