साधना कंपनी स्फोटप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा; कामाच्या पद्धती, अपुरी सुरक्षा व्यवस्था ठरली कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 07:24 AM2024-09-15T07:24:08+5:302024-09-15T07:24:42+5:30

या दुर्घटनेत तीन कामगारांना आपला जीव गमवावा लागला तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Case against contractor in Sadhana Company explosion case; Work methods, inadequate security systems were the cause | साधना कंपनी स्फोटप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा; कामाच्या पद्धती, अपुरी सुरक्षा व्यवस्था ठरली कारणीभूत

साधना कंपनी स्फोटप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा; कामाच्या पद्धती, अपुरी सुरक्षा व्यवस्था ठरली कारणीभूत

रोहा : धाटाव एमआयडीसीमधील साधना नायट्रोकेम या कंपनीतील स्फोटाप्रकरणी एम. के. फॅब्रिकेटर या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाला असला, तरी स्फोटाला जबाबदार असलेल्या कंपनी प्रशासनावर कारवाई केव्हा होणार? असा सवाल कामगारांनी केला आहे.

रोहा पोलिस ठाण्यात एम. के. फॅब्रिकेटर या ठेकेदार एजन्सीचे मालक मोहन लाल आणि इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या दुर्घटनेला कामाच्या पद्धती आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था कारणीभूत ठरल्याचे समोर आले. या दुर्घटनेत तीन कामगारांना आपला जीव गमवावा लागला तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

सुरक्षा साधने पुरवली गेली नाहीत

  या दुर्घटनेत तीन कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. यावेळी असे आढळून आले आहे की, घटनास्थळी सेफ्टी ऑपरेटर उपस्थित नव्हता तसेच कामगारांना सुरक्षा साधने पुरवली गेली नाहीत.

  औद्योगिक सुरक्षा विभागाचे फॅक्टरी इन्स्पेक्टर यांनी चार्जशीट दाखल न केल्याने त्यांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त होत आहे.

फॅक्टरी इन्स्पेक्टरची कारवाई नाही

  साधना कंपनीचे सेफ्टी मॅनेजर रजेवर असताना कंपनी प्लांटमध्ये वेल्डिंगचे वर्क-परमिट दिले गेले.

  घटनास्थळी सेफ्टी ऑपरेटर उपस्थित नव्हता. कामगारांना सुरक्षा साधने पुरवली गेली नाहीत.

  या दुर्घटनेला दोन दिवस उलटून गेले तरीदेखील औद्योगिक सुरक्षा विभागाच्या फॅक्टरी इन्स्पेक्टरने कुठलीही कारवाई केलेली नाही.

  त्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी कामगारांमध्ये संशय निर्माण झाला आहे.

Web Title: Case against contractor in Sadhana Company explosion case; Work methods, inadequate security systems were the cause

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.