कर्जत-कल्याण राज्यमार्ग खचण्याच्या स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 03:26 AM2018-07-23T03:26:40+5:302018-07-23T03:27:00+5:30
बांधकाम व्यावसायिकांनी पाण्याच्या प्रवाहाची दिशाही बदलली; संबंधित विभागाचे दुर्लक्ष
- कांता हाबळे
नेरळ : कर्जत-कल्याण या राज्यमार्गाला लागून कर्जत तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांची बांधकामे सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु गेल्या काही वर्षांत कर्जत-कल्याण राज्यमार्गाची दुरवस्था पाहता हा राज्यमार्ग आहे का?असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे.
राज्यमार्गाला मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचा विळखा पडला आहे आणि आता तर बांधकाम व्यावसायिकांनी रस्त्यावरील मोºया बंद करून पाण्याच्या प्रवाहाची दिशाच बदलली आहे. याकडे बांधकाम विभागाकडूनही दुर्लक्ष होत असल्याने कर्जत-कल्याण राज्यमार्ग खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कर्जत ते वांगणी (डोणे) हा रस्ता बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. हा रस्ता प्रवासासाठी धोकादायक झाला आहे. २० कि.मी.चा रस्ता पार करण्यासाठी चालकांना एक तासाहून अधिक वेळ लागतो. आता तर बांधकाम व्यावसायिकांनी अडथळा ठरणाºया रस्त्यालगतच्या काही मोºयाच बंद केल्या आहेत. सध्या पावसाचा जोर कायम असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. बांधकामामध्ये प्रवाह आड येत असल्याने व्यावसायिकांनी या ठिकाणी नैसर्गिक प्रवाहाची दिशाच बदलली आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या मनमानीमुळे पावसाचे पाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहत आहे. यामुळे रस्त्यालगतची माती वाहून गेली आहे आणि रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहासाठी महामार्गालगतच्या मोºया पूर्ववत कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. आठवडाभरापूर्वी याच मार्गावर डिकसळ येथील एका हॉस्पिटलच्या मालकाने अनधिकृत बांधकाम करत नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवला. त्यामुळे सर्व पाणी या राज्य मार्गावर वाहत होते. या वाहत्या पाण्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डा पडून दुर्घटना होण्याची तसेच रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे.
अतिक्रमणाची कारणे
बिल्डरांना स्थानिक पुढारी, ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला आणि असेसमेंट उतारा दिला जातो, महावितरण वीजजोडणी देते आणि अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांना अभय मिळते. एकमेकांचे साटेलोट्याने अतिक्रमणे उभी राहत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
ज्या बिल्डरांनी रस्त्याच्या कडेला मातीचा भराव केला आहे, त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत; परंतु हे बिल्डर मनमानी करतात. बांधकाम विभागाच्या अधिकाºयांशी अरेरावी करतात. या प्रकाराकडे स्थानिक तलाठी आणि तहसीलदार यांनीही लक्ष देण्याची गरज आहे. मागील आठवड्यात डिकसळ येथील अतिक्र मण पोलीस बंदोबस्त घेऊन काढले आहे. तसेच ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यासंदर्भात महावितरणला कळविले आहे.
- अजयकुमार सर्वगोड, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
माणगावच्या टेकडीवरून येणारे पाणी कर्जत-कल्याण राज्यमार्गाला असणाºया मोºयांमधून वाहून जात होते; परंतु बिल्डरने या मोºया बंद केल्याने मार्ग खचला आहे. बांधकाम विभागाने अशा बिल्डरवर कारवाई करावी, अन्यथा राज्यमार्ग खचेल.
- सावळाराम जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य