शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कर्जत-कल्याण राज्यमार्ग खचण्याच्या स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 3:26 AM

बांधकाम व्यावसायिकांनी पाण्याच्या प्रवाहाची दिशाही बदलली; संबंधित विभागाचे दुर्लक्ष

- कांता हाबळेनेरळ : कर्जत-कल्याण या राज्यमार्गाला लागून कर्जत तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांची बांधकामे सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु गेल्या काही वर्षांत कर्जत-कल्याण राज्यमार्गाची दुरवस्था पाहता हा राज्यमार्ग आहे का?असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे.राज्यमार्गाला मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचा विळखा पडला आहे आणि आता तर बांधकाम व्यावसायिकांनी रस्त्यावरील मोºया बंद करून पाण्याच्या प्रवाहाची दिशाच बदलली आहे. याकडे बांधकाम विभागाकडूनही दुर्लक्ष होत असल्याने कर्जत-कल्याण राज्यमार्ग खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कर्जत ते वांगणी (डोणे) हा रस्ता बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. हा रस्ता प्रवासासाठी धोकादायक झाला आहे. २० कि.मी.चा रस्ता पार करण्यासाठी चालकांना एक तासाहून अधिक वेळ लागतो. आता तर बांधकाम व्यावसायिकांनी अडथळा ठरणाºया रस्त्यालगतच्या काही मोºयाच बंद केल्या आहेत. सध्या पावसाचा जोर कायम असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. बांधकामामध्ये प्रवाह आड येत असल्याने व्यावसायिकांनी या ठिकाणी नैसर्गिक प्रवाहाची दिशाच बदलली आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या मनमानीमुळे पावसाचे पाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहत आहे. यामुळे रस्त्यालगतची माती वाहून गेली आहे आणि रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहासाठी महामार्गालगतच्या मोºया पूर्ववत कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. आठवडाभरापूर्वी याच मार्गावर डिकसळ येथील एका हॉस्पिटलच्या मालकाने अनधिकृत बांधकाम करत नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवला. त्यामुळे सर्व पाणी या राज्य मार्गावर वाहत होते. या वाहत्या पाण्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डा पडून दुर्घटना होण्याची तसेच रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे.अतिक्रमणाची कारणेबिल्डरांना स्थानिक पुढारी, ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला आणि असेसमेंट उतारा दिला जातो, महावितरण वीजजोडणी देते आणि अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांना अभय मिळते. एकमेकांचे साटेलोट्याने अतिक्रमणे उभी राहत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.ज्या बिल्डरांनी रस्त्याच्या कडेला मातीचा भराव केला आहे, त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत; परंतु हे बिल्डर मनमानी करतात. बांधकाम विभागाच्या अधिकाºयांशी अरेरावी करतात. या प्रकाराकडे स्थानिक तलाठी आणि तहसीलदार यांनीही लक्ष देण्याची गरज आहे. मागील आठवड्यात डिकसळ येथील अतिक्र मण पोलीस बंदोबस्त घेऊन काढले आहे. तसेच ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यासंदर्भात महावितरणला कळविले आहे.- अजयकुमार सर्वगोड, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागमाणगावच्या टेकडीवरून येणारे पाणी कर्जत-कल्याण राज्यमार्गाला असणाºया मोºयांमधून वाहून जात होते; परंतु बिल्डरने या मोºया बंद केल्याने मार्ग खचला आहे. बांधकाम विभागाने अशा बिल्डरवर कारवाई करावी, अन्यथा राज्यमार्ग खचेल.- सावळाराम जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य

टॅग्स :Karjatकर्जतroad safetyरस्ते सुरक्षा