५८ गावांमधील व्यवहार लवकर होणार कॅशलेस

By admin | Published: February 19, 2017 03:56 AM2017-02-19T03:56:09+5:302017-02-19T03:56:09+5:30

नोटाबंदीनंतर सरकारने कॅशलेस व्यवहार वाढविण्यासाठी देशातील जनतेला आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन, रायगड जिल्हा मध्यवर्ती

The cash in 58 villages will be faster | ५८ गावांमधील व्यवहार लवकर होणार कॅशलेस

५८ गावांमधील व्यवहार लवकर होणार कॅशलेस

Next

- जयंत धुळप,  अलिबाग
नोटाबंदीनंतर सरकारने कॅशलेस व्यवहार वाढविण्यासाठी देशातील जनतेला आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या ५८ शाखांच्या माध्यमातून प्रत्येकी एक गाव दत्तक घेण्याची योजना आखून त्या गावांतील सर्व कुटुंबांना कॅशलेसबाबत प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. येत्या काही दिवसांत या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५८ गावे कॅशलेस होतील, अशी माहिती रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी दिली आहे.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रत्येक शाखेने एका गावाची निवड करून त्यामध्ये हे काम सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय कार्यालयातील कर्जे व देखरेख विभागाने अलिबाग तालुक्यातील ढवर हे गाव दत्तक घेतले आहे. या गावांत डिजिटल आर्थिक साक्षरतेबाबत मार्गदर्शन व लायन्स क्लब अलिबाग यांच्या सहकार्याने मोफत नेत्रतपासणी शिबिर आयोजित केले होते. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी कॅशलेस बँकिगचे विविध फायदे ग्रामस्थांना समजावून सांगताना गावातील सर्व जनतेला बँकेमध्ये खाते उघडून कॅशलेस व डिजिटल व्यवहार करण्याबाबत मार्गदर्शन केले. बँकेतर्फे शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या शेती कर्जाबाबत मार्गदर्शन केले.
लायन्स क्लब अलिबागचे अध्यक्ष नयन कौळे यांनी नेत्रतपासणी शिबिर व क्लब आयोजित करत असलेल्या इतर सर्व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. आजपर्यंत ५०० मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केली असल्याचे त्यांनी सांगितले.

बँक आणि स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग
कर्जे व देखरेख विभागाचे चीफ मॅनेजर मंदार वर्तक, ढवर ग्रामपंचायतीचे सदस्य मंगेश पाटील, अलिबाग लायन्स क्लब अध्यक्ष नयन कवळे आदींच्या माध्यमातून बँक,लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्था यांचा सक्रिय सहभाग आहे.
भविष्यात होणाऱ्या बँकेच्या सर्व उपक्रमांत आवर्जून सहभाग घेणार असल्याचे लायन्स क्लब अलिबागचे अध्यक्ष नयन कौळे यांनी सांगितले. नेत्रतपासणीचा गावातील सुमारे १०० ग्रामस्थांनी लाभ घेतला. बँकेने गाव दत्तक घेऊन या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रथम विचार करु न शिबिराचे आयोजन के ले.

- बँकेतर्फे शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या शेती कर्जाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो व त्यासाठी ग्रामीण भागातील जनतेला बँकेतर्फे सामाजिक मदत करण्याच्या दृष्टीने लायन्स क्लबच्या वतीने गावात अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जातील, असे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: The cash in 58 villages will be faster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.