शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

५८ गावांमधील व्यवहार लवकर होणार कॅशलेस

By admin | Published: February 19, 2017 3:56 AM

नोटाबंदीनंतर सरकारने कॅशलेस व्यवहार वाढविण्यासाठी देशातील जनतेला आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन, रायगड जिल्हा मध्यवर्ती

- जयंत धुळप,  अलिबागनोटाबंदीनंतर सरकारने कॅशलेस व्यवहार वाढविण्यासाठी देशातील जनतेला आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या ५८ शाखांच्या माध्यमातून प्रत्येकी एक गाव दत्तक घेण्याची योजना आखून त्या गावांतील सर्व कुटुंबांना कॅशलेसबाबत प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. येत्या काही दिवसांत या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५८ गावे कॅशलेस होतील, अशी माहिती रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी दिली आहे.रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रत्येक शाखेने एका गावाची निवड करून त्यामध्ये हे काम सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय कार्यालयातील कर्जे व देखरेख विभागाने अलिबाग तालुक्यातील ढवर हे गाव दत्तक घेतले आहे. या गावांत डिजिटल आर्थिक साक्षरतेबाबत मार्गदर्शन व लायन्स क्लब अलिबाग यांच्या सहकार्याने मोफत नेत्रतपासणी शिबिर आयोजित केले होते. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी कॅशलेस बँकिगचे विविध फायदे ग्रामस्थांना समजावून सांगताना गावातील सर्व जनतेला बँकेमध्ये खाते उघडून कॅशलेस व डिजिटल व्यवहार करण्याबाबत मार्गदर्शन केले. बँकेतर्फे शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या शेती कर्जाबाबत मार्गदर्शन केले. लायन्स क्लब अलिबागचे अध्यक्ष नयन कौळे यांनी नेत्रतपासणी शिबिर व क्लब आयोजित करत असलेल्या इतर सर्व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. आजपर्यंत ५०० मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केली असल्याचे त्यांनी सांगितले. बँक आणि स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभागकर्जे व देखरेख विभागाचे चीफ मॅनेजर मंदार वर्तक, ढवर ग्रामपंचायतीचे सदस्य मंगेश पाटील, अलिबाग लायन्स क्लब अध्यक्ष नयन कवळे आदींच्या माध्यमातून बँक,लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्था यांचा सक्रिय सहभाग आहे.भविष्यात होणाऱ्या बँकेच्या सर्व उपक्रमांत आवर्जून सहभाग घेणार असल्याचे लायन्स क्लब अलिबागचे अध्यक्ष नयन कौळे यांनी सांगितले. नेत्रतपासणीचा गावातील सुमारे १०० ग्रामस्थांनी लाभ घेतला. बँकेने गाव दत्तक घेऊन या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रथम विचार करु न शिबिराचे आयोजन के ले.- बँकेतर्फे शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या शेती कर्जाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो व त्यासाठी ग्रामीण भागातील जनतेला बँकेतर्फे सामाजिक मदत करण्याच्या दृष्टीने लायन्स क्लबच्या वतीने गावात अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जातील, असे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.