शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 2:58 AM

उमेदवारी अर्ज आॅनलाईन भरल्यानंतर संबंधित कागदपत्रांसह आपला अर्ज रोहा तहसील कार्यालयात नेमलेल्या निवडणूक अधिका-याकडे भरावयाचा आहे.

नागोठणे : उमेदवारी अर्ज आॅनलाईन भरल्यानंतर संबंधित कागदपत्रांसह आपला अर्ज रोहा तहसील कार्यालयात नेमलेल्या निवडणूक अधिका-याकडे भरावयाचा आहे. सरपंचपद तसेच इतर प्रभागांत असणाºया राखीव जागेसाठी अर्ज भरताना त्यासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य राहाणार असल्याचे रोहा तहसीलदार सुरेश काशीद यांनी स्पष्ट केले.येथील ग्रामपंचायतीची निवडणूक २५ फेब्रुवारीला होत आहे. सोमवारी ५ फे ब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासंदर्भातील सभा शनिवारी सायंकाळी येथील ग्रामपंचायतीच्या शिवगणेश सभागृहात पार पडली, त्यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार काशीद बोलत होते. निवडणुकी दरम्यान आचारसंहितेचे पालन करण्यासंदर्भात काशीद यांनी उपस्थितांसमोर ठळक मुद्दे स्पष्ट केले. मतदारावर प्रभाव पाडणारे कोणतेही कार्य करू नये. नागोठणे सीमेलगतच्या गावांमध्ये सुद्धा पर्यायाने आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचे पालन करण्यासंदर्भात पथक तयार केले जाणार असून आचारसंहितेचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी गुन्हा नोंदविणार आहेत. जाहीर प्रचार तसेच इलेक्ट्रॉनिक्स मिडिया अर्थात एसएमएस आणि व्हॉट्स अ‍ॅपवरील प्रचार मतदानाच्या ४८ तास बंद करणे अनिवार्य राहील. प्रचाराच्या छापील मजकुराची परवानगी घेतल्यानंतरच त्याला अधिकृत म्हणून मान्यता मिळेल. नागोठणे हद्दीत ज्यांचे कायमचे वास्तव्य नसेल, त्यांनी प्रचाराची मुदत संपल्यानंतर येथे वास्तव्य करू नये. धार्मिक स्थळांचा वापर प्रचारासाठी करू नये. प्रत्येक उमेदवाराला तहसील कार्यालयाकडून परवानगी घेतल्यानंतर एक चारचाकी किंवा दोन दुचाकींचा वापर करता येईल. ध्वनिक्षेपकाचा वापर परवानगी शिवाय करता येणार नसून प्रचाराच्या जाहीर सभेसाठी नागोठणे पोलिसठाण्याची परवानगी घेणे बंधनकारक राहील. आचारसंहितेचा भंग केल्याबाबतची तक्र ार नेमलेला निवडणूक अधिकारी किंवा रोहे तहसील कार्यालयात करावी व त्याबाबत संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाईल असे तहसीलदार काशीद यांनी बैठकीत स्पष्ट केले.पोलीस निरीक्षक गोफणे यांनी मतदानाची तारीख २५ फेब्रुवारी आहे व त्या दिवशी रविवार असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार नागोठणे शिवाजी चौकालगत भरणारा आठवडा बाजार त्या दिवशी भरणार नसल्याचे यावेळी स्पष्ट केले.या सभेला पो. नि. पांडुरंग गोफणे, सरपंच प्रणय डोके, महसूल खात्याचे मंडळ अधिकारी अरु ण गणतांडेल, ग्रामविकास अधिकारी योगेश गायकवाड आदींसह महसूल खात्याचे कर्मचारी आणि सर्वपक्षीय नागरिक उपस्थित होते.>निवडणूक २५ फे ब्रुवारीलानागोठणे ग्रामपंचायतीची निवडणूक २५ फेब्रुवारीला होत आहे. सोमवारी ५ फे ब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे.आचारसंहितेचा भंग केल्याबाबतची तक्र ार नेमलेला निवडणूक अधिकारी किंवा रोहे तहसील कार्यालयात करावी.