श्रीवर्धन : भारतीय सण उत्सवात दिवाळीला विशेष महत्त्व आहे. पारंपरिक वेशभूषा, फटाक्यांची अतषबाजी व विविध गोड पदार्थांची रेलचेल हे दिवाळी सणाचे वैशिष्ट्ये अधोरेखित करते. श्रीवर्धन शहरात मराठी संस्कृती प्रतिष्ठानने दिवाळी सणाच्या सुट्टीत बालगोपाल व तरुण मंडळीसाठी किल्ले स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. शहरातील सर्व पाखडीतील मुलांनी या स्पर्धेत सहभागी होत दिवाळी सुट्टीचा आनंद लुटला. विशेष म्हणजे यावेळी टाकाऊ वस्तूपासून मुलांनी किल्ले बनवले.
श्रीवर्धन शहरांत आज ही मोठ्या प्रमाणात कौलारू घरे आहेत. घराच्या अंगणात मोकळ्या जागेवर मुलांनी किल्ल्यांची प्रतिकृती तयार केली आहे. रायगड, प्रतापगड, पन्हाळा, पुरंदर , जंजिरा आदी किल्लयांच्या प्रतिकृ ती मुलांनी तयार के ल्या. किल्ल्यांच्या निर्मितीसाठी बालगोपालांनी घरातील टाकाऊ घटकांचा वापर केला आहे. तुटलेले गोणपाट, घर कामातून उरलेल्या विटा, पाण्याचे सिंचन करण्यासाठी घरातील वापरात नसलेली टाकाऊ भांडी, सलाईनच्या नळ्या त्या सोबत गवताची निर्मिती करण्यासाठी गहू व रांगोळीचा उपयोग केला आहे हे यातील वैशिष्ट्य.
मुलांमध्ये इतिहासा विषयी ओढ निर्माण व्हावी व दिवाळी सण साजरा करताना मुलांनी पर्यावरणाच्या ºहास होणार नाही यासाठी जागरूक बनावे यासाठी किल्ले स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे अमर गुरव यांनी सांगितले.
किल्ले स्पर्धेत सहभाग घेऊन आनंद झाला आहे. किल्ल्याची निर्मिती घरातील विविध टाकाऊ पदार्थांचा वापर केला आहे. दिवाळीची सुट्टी लागल्या पासून किल्ल्याची तयारी करत होतो. सुट्टीच्या काळात मित्रांच्या मदतीने किल्ल्या विषयी सर्व माहिती गोळा केली व त्याचा उपयोग करून किल्ला बांधला आहे. - दिग्विजय करंजकर, विद्यार्थी, श्रीवर्धनमी या किल्ले स्पधेर्साठी जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती बनवली आहे. जंजिरा किल्ला श्रीवर्धनच्या जवळ आहे. मी जेव्हा किल्ला बनवण्यास सुरुवात केली आहे तेव्हा किल्ल्या विषयी सर्व घटकांची मला माहिती झाली यांचा आनंद आहे.- रोहित भोगल,विद्यार्थी, श्रीवर्धन