जिल्ह्यातील १०,७११ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 02:27 AM2018-04-17T02:27:00+5:302018-04-17T02:27:00+5:30

स्वदेश फाउंडेशनच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, तळा, म्हसळा व श्रीवर्धन या सहा तालुक्यांमध्ये तब्बल १०,७११ मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. २,१५,२९५ रु ग्णांनी स्वदेश मित्रांमार्फत विविध योजनांचा लाभ घेतला.

 Cataract surgery on 10,711 patients in the district | जिल्ह्यातील १०,७११ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

जिल्ह्यातील १०,७११ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

Next

म्हसळा : स्वदेश फाउंडेशनच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, तळा, म्हसळा व श्रीवर्धन या सहा तालुक्यांमध्ये तब्बल १०,७११ मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. २,१५,२९५ रु ग्णांनी स्वदेश मित्रांमार्फत विविध योजनांचा लाभ घेतला. यात १,२६,२०८ रु ग्णांची अत्याधुनिक यंत्रांद्वारे मोफत तपासणी करण्यात आली; तर ५५,०७६ रु ग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आहे.
स्वदेश आरोग्य विभागामार्फत स्वरक्षा-एक्स्प्रेसला म्हसळा तालुक्यातून २७ नोव्हेंबर २०१३ रोजी सुरु वात झाली. नंतर दुसरी स्वरक्षा एक्स्प्रेस तळा तालुक्यामध्ये, तिसरी स्वरक्षा एक्स्प्रेस पोलादपूर तालुक्यातून सुरू झाली.
स्वरक्षा-एक्स्प्रेसमध्ये डोळे तपासणीचे आधुनिक मशीन बसविले आहे व नेत्रतज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात येते. याशिवाय प्रत्येक गुरु वारी स्वदेश कार्यालय लोणेरे व ग्रामीण रु ग्णालय महाड येथे स्वरक्षा एक्स्प्रेसमध्ये नेत्र रु ग्णांची तपासणी करण्यात येते.
मोतीबिंदू असणाऱ्या रु ग्णांची मोफत शस्त्रक्रि या नामांकित सहयोगी रु ग्णालये, लक्ष्मी धर्मादाय
रु ग्णालय, पनवेल आणि एच. व्ही. देसाई रुग्णालय पुणे येथे
स्वदेशच्या सहकाºयाने करण्यात
येते.

- स्वदेश फाउंडेशन मार्फत सहा तालुक्यांमध्ये मोतीबिंदू निर्मूलन करण्याचा उपक्र मामुळे आता ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांच्या काळजीविषयी जाणीव निर्माण झाली आहे. दक्षिण रायगडमध्ये डोळ्यांच्या आजाराची समस्या जाणवत असेल तर विद्यार्थी व ग्रामस्थांनी स्वरक्षा एक्स्प्रेसमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन स्वदेशचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांनी केले आहे. मोतीबिंदूमुक्त गाव करण्याचे ध्येय बाळगून स्वदेश फाउंडेशनचे कार्यकर्ते निरंतर प्रयत्न करीत आहेत.

Web Title:  Cataract surgery on 10,711 patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड