पर्ससीन नेटद्वारे मच्छीमारी करणाऱ्यांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 01:12 AM2021-04-10T01:12:26+5:302021-04-10T01:12:32+5:30

६ सिलिंडर असणाऱ्या ३ नौकांना रात्रीच्या १२ च्या सुमारास गस्ती नौका मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र या अधिकाऱ्यांनी पकडून आगरदांडा जेटीवर आणून त्याच्यावर कारवाई करण्यात आली. 

Catching fishermen by perch net | पर्ससीन नेटद्वारे मच्छीमारी करणाऱ्यांना पकडले

पर्ससीन नेटद्वारे मच्छीमारी करणाऱ्यांना पकडले

Next

आगरदांडा : मुरूड समुद्रकिनाऱ्यापासून ३५ किलोमीटर खोल समुद्रात रात्रीच्या वेळी एलईडी दिव्यांचा वापर करत पर्ससीन नेटच्या साह्याने मासेमारी करताना ६ सिलिंडर असणाऱ्या ३ नौकांना रात्रीच्या १२ च्या सुमारास गस्ती नौका मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र या अधिकाऱ्यांनी पकडून आगरदांडा जेटीवर आणून त्याच्यावर कारवाई करण्यात आली. 

यावेळी प्रादेशिक उपायुक्त मत्स्य विभाग महेश देवरे, मत्स्य विभाग सहायक आयुक्त मुंबई संजय वाटेगावकर, मत्स्य विभाग अधिकारी मुंबई संजय माने, परवाना अधिकारी स्वप्नील दाबणे, परवाना अधिकारी तुषार वाळुंज, सुरक्षारक्षक केतन भगत, अलिबाग पोलीस मुख्यालय पोलीस शिपाई ओमकार सोंडकर, पोलीस शिपाई दामोदर खटले, पोलीस हवालदार योगेश हटकर, उपनिरीक्षक दत्तात्रय भोसले आदींसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत माशांचे साठेच नष्ट करणाऱ्या एलईडी पर्ससीन नेटवर मासेमारीवर मत्स्य विभागाने बंदी घालण्याचे आदेश देऊनही या आदेशांना केराची टोपली दाखवत रत्नागिरी या ठिकाणावरून जय भैरी आय एन.डी.- एम.एच.-४ एम.एम.-११८० ही ६ सिलिंडरची एलईडी नौका, धनदैलत आय.एन.डी. एम.एच.-४ एम.एम.-१०२४ ही ६ सिलिंडरची पर्ससीन नेट नौका, धनलक्ष्मी आय.एन.डी. एम.एच.-४ एम.एम.-१४८१ ही ६ सिलिंडरची नौका मुरूड समुद्रकिनारी येऊन एलईडी- पर्ससीन नेटच्या साह्याने मासेमारी करीत असताना अधिकाऱ्यांनी पकडले. मालकासह ३५ जणांवर कारवाई करून मुरूड तहसीलदार यांच्याकडे आणण्यात येणार आहे. या ३ नौकांमधून एलईडी दिवे, जनरेटर, बॅटरी व इतर वस्तू, ३०० किलो बारीक मच्छी या वस्तूचा पंचनामा करून ताब्यात घेतल्या. मत्स्य विभागाने आशा कारवाया सुरू ठेवल्यास अवैद्य मासेमारीला चाप बसेल, असे जयभवानी मच्छीमार सोसायटीचे चेअरमन महेंद्र गार्डी, प्रकाश सरपाटील, जगन वाघरे यांनी सांगितले.

Web Title: Catching fishermen by perch net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.