सीसीटीव्हीची दिशा बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 12:14 AM2018-10-27T00:14:25+5:302018-10-27T00:14:33+5:30

सावधान.... आपण सीसीटीव्हीच्या निगरानी खाली आहात, असे फलक आपण बँका, वित्तीय संस्था, ज्वेलरी शॉप, विविध दुकानांमध्ये लावलेले दिसतात.

 CCTV direction will change | सीसीटीव्हीची दिशा बदलणार

सीसीटीव्हीची दिशा बदलणार

Next

- आविष्कार देसाई
अलिबाग : सावधान.... आपण सीसीटीव्हीच्या निगरानी खाली आहात, असे फलक आपण बँका, वित्तीय संस्था, ज्वेलरी शॉप, विविध दुकानांमध्ये लावलेले दिसतात. सीसीटीव्हीचा गुन्हे रोखण्याबरोबरच कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी उपयोग करण्यात येतो. टेक्नॉलॉजीचा वापर करणे हे चांगले असले, तरी रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमºयांची नजर महिला कर्मचाºयांसाठी त्रासदायक ठरत आहे.
महिला कर्मचाºयांच्या तक्रारीनंतर सीसीटीव्ही कॅमेºयांचे डायरेक्शन सायंकाळपर्यंत बदलण्यात येईल. कोणत्याही महिला कर्मचाºयांना असुरक्षित वाटणार नाही, याची ग्वाही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली.
रायगड जिल्हा परिषदेतील काही विभागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याचा अ‍ॅक्सेस हा कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांच्या दालानातील स्क्रीनवर देण्यात आलेला आहे. संबंधित विभागाचा अधिकारी आपल्या विभागातील कर्मचारी कामे करतात की नाही, कार्यालयीन वेळेमध्ये कोणी कार्यालय सोडून जातो का, त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांच्यावर नजर ठेवून असतो.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाºयांच्या दालानामध्ये सुमारे सहा सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. एकूण १६ महिला कर्मचारी आहेत. त्यातील बाहेरील दालनामध्ये १४ आणि आतली दालनामध्ये दोन महिला कर्मचारी बसतात. यातील गंभीर बाब म्हणजे या सीसीटीव्ही कॅमेºयाची नजर ‘वाकडी’ आहे. त्यामुळे महिला कर्मचाºयांना असुरक्षित वाटत असल्याने बसवण्यात आलेल्या कॅमेºयाचे डायरेक्शन बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.
आतील दालनात दोन महिला कर्मचारी बसतात. त्यांच्या डोक्याच्या वरील भागात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बाहेरील दालनातील सीसीटीव्हीचे डायरेक्शनही महिला कर्मचाºयांच्या दृष्टीने असुविधाजनक वाटत असल्याचे दिसून आले. सीसीटीव्ही लावण्याबद्दल कोणाचेच दुमत नाही; परंतु त्या सीसीटीव्हीची ‘वाकडी’ नजर धोकादायक असल्याची चर्चा दबक्या आवाजात जिल्हा परिषद परिसरात होत होती. यातील गंभीरबाब म्हणजे सीसीटीव्ही बसवण्यासाठी कोणत्याही वरिष्ठ अधिकाºयाची परवानगी घेतलेली नाही, तसेच सीसीटीव्हीसाठी निविदा काढलेली नाही. त्यामुळे हे सीसीटीव्ही नक्की कशासाठी बसवले आहेत. याबाबत उलट-सुलट चर्चा होत आहे. ज्या विभागात महिला बसतात, त्या विभागात नेऊन त्यांना कॅमेºयाचे डायरेक्शन कसे चुकीचे आहे हे दाखवले. सीसीटीव्ही कॅमेºयाचे डायरेक्शन लवकरच बदलण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. कोणत्याही महिला कर्मचाºयांना असुरक्षित वाटणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
>कॅमेºयाचे अ‍ॅक्सेस जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्या दालनात
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्याशी संपर्क साधला असता सीसीटीव्हीला परवानगी घेतल्याबाबतचे पत्र ते दाखवू शकले नाहीत, त्याचप्रमाणे निविदा मागवल्या होत्या का, यावरही ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. ते या विभागाचे वरिष्ठ असल्याने सीसीटीव्हीचा अ‍ॅक्सेस त्यांच्या दालानातील स्क्रीनवर देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित विभागाचा अधिकारी आपल्या विभागातील कर्मचारी कामे करत आहेत की नाहीत. कार्यालयीन वेळेमध्ये असताना कोणी कार्यालय सोडून जातो का, त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांच्यावर नजर ठेवून असतो.

Web Title:  CCTV direction will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.