मुरुड : जंजिरा मुक्ती संग्राम दिन मुरुडमध्ये साजरा करण्यात आला. नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी ध्वजारोहण केले.या वेळी मुरुड शहरातील दत्तवाडी परिसरात राहणारे समाजसेवक विजय सुर्वे यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.३१ जानेवारी हा दिवस मुरु ड तालुका पत्रकार संघ व रायगड प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जंजिरा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या वेळी पत्रकार संघातील सर्व प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक व प्रतिष्ठित नागरिक व सर एस.ए. हायस्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुरु ड नगरपरिषदेच्या संतोष तवसाळकर सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्र मात नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ३१ जानेवारी हा दिवस पत्रकार संघाकडून जंजिरा मुक्ती संग्राम दिन साजरा होत असतो. १५ आॅगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला असला तरी श्रीवर्धन, म्हसळा व मुरु ड या तीन तालुक्यांना नवाबाने ३१ जानेवारी १९४८ रोजी शामिलनाम्यावर सही केल्याने खऱ्या अर्थाने ते त्या वेळी भारतात समाविष्ट झाले. त्यामुळे जंजिरा मुक्ती दिन हा लोकउत्सव म्हणून सर्वांनी साजरा केला पाहिजे. यासाठी मुरुड तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपला उत्सव म्हणून सहभाग घेऊन याला लोकउत्सवाचे स्वरूप द्यावे, असे आवाहन के ले.या वेळी मुरु ड शहरातील दत्तवाडी परिसरात राहणारे समाजसेवक विजय सुर्वे यांना विशेष पुरस्कार देऊन नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. समाजसेवक विजय सुर्वे यांनी शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी नेत्र शिबिर, हृदयविकार शिबिर तसेच वेळप्रसंगी रु ग्णांना तातडीची सेवा मिळण्यासाठी मुंबई येथील जे.जे.रु ग्णालयात पेशन्ट नेऊन रुग्णांचे आर्युमान वाढवण्याची मोलाचे कार्य केल्याबद्दल पत्रकार संघातर्फे त्यांना उत्कृष्ट आरोग्य सेवक हा पुरस्कार देऊन मोठा सन्मान करण्यात आला आहे. या वेळी पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे, गटनेत्या मुग्धा जोशी, महिला व बालकल्याण सभापती प्रांजली मकू आदी मान्यवर उपस्थित होते.आगरवाडा हायस्कूलच्या पटांगणात ध्वजारोहणम्हसळा : हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यावर तब्बल साडेचार महिन्यांनी हिंदुस्थानात विलीन होणाºया संस्थानातील आपल्या भागातील आजची मानसिकता अजूनही तशाच पद्धतीची आहे, याचे दाखले देऊन माजी सभापती महादेव पाटील यांनी खंत व्यक्त केली.जंजिरा संस्थान मुक्ती संग्राम दिन गुरुवारी म्हसळा तालुक्यातील जिजामाता शिक्षण संस्थेच्या आगरवाडा हायस्कूलच्या पटांगणात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी सभापती महादेव पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करून संपन्न झाला.या वेळी २०१६ च्या पहिल्या जंजिरा संस्थान मुक्ती संग्राम दिनाच्या म्हसळे येथील प्रसंगाची आठवणही पाटील यांनी करून दिली. शासन आता सतर्क झाले आहे. शासनाने जंजिरा किल्ल्यावर सतत तिरंगा फडकावीत ठेवला आहे, मराठवाडा मुक्ती दिन ज्या प्रमाणे शासकीय पातळीवर साजरा करतो, त्याच पद्धतीने जंजिरा संस्थान मुक्ती संग्राम दिन दर ३१ जानेवारीला शासनाने साजरा करावा, अशी मागणीही केली. जिजामाता तालुका वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे आदी उपस्थित होते.
मुरुडमध्ये जंजिरा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:34 PM