बकरी ईद उत्साहात साजरी
By admin | Published: September 14, 2016 04:41 AM2016-09-14T04:41:47+5:302016-09-14T04:41:47+5:30
दरवर्षाप्रमाणे मुस्लीम धर्माप्रमाणे वर्षाच्या १२ व्या महिना जुलहद या महिन्याचा चंद्र दिसल्यानंतर होणारा सण यास बकरी ई असे म्हटले जाते.
दासगाव : दरवर्षाप्रमाणे मुस्लीम धर्माप्रमाणे वर्षाच्या १२ व्या महिना जुलहद या महिन्याचा चंद्र दिसल्यानंतर होणारा सण यास बकरी ई असे म्हटले जाते. या ईदीला धर्मामध्ये रमजान ईदीप्रमाणे स्थान आहे. याच महिन्यामध्ये हज होते. तसेच या ईदच्या दिवशी हजरत इब्राहिम अले अस्सलाम यांनी दिलेल्या कुरबानीची परंपरा ही आज कायम असून मंगळवारी झालेली ही बकदी ईद संपूर्ण महाड तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या ईदनिमित्ताने हिंदू बांधवांनी मुस्लीम समाजाला शुभेच्छा दिल्या. अनेक गावांमध्ये झेंडा मिरवणूक देखील काढली होती.
रमजान ईद ही मुस्लीम धर्माच्या महिन्याप्रमाणे ९ व्या महिन्यात रमजानमध्ये येते. तसेच बकरी ईद धर्माच्या महिन्याप्रमाणे १२ व्या जुलहद महिन्याच्या १० तारखेला होते. या बकरी ईदीला धर्मामध्ये मोठे स्थान आहे. मुस्लिम धर्मात मुख्य पाच अनिवार्य कर्तव्ये आहेत यात परमेश्वर व त्याचे प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी श्रद्धा, नमाज, रोजा, जकात व हज यांचा समावेश आहे. त्यापैकी हज हे या १० तारखेला पूर्ण करता येते.
महाड तालुक्यात मोठ्या उत्साहात तालुक्यातील दासगाव, वीर, टोळ, दाभोळ, चिंभावे, तेलंगे, तुडील, कुंबळे, वहूर, केंबुर्ली अशा अनेक गावांमध्ये मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी करण्यात आली. (वार्ताहर)