आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कटीबध्द - नारायण राणे
By निखिल म्हात्रे | Published: January 15, 2024 03:41 PM2024-01-15T15:41:57+5:302024-01-15T15:42:08+5:30
अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी हाॅलवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड व एकात्मित आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्यावतीने प्रधानमंत्री जनजात आदिवासी न्याय महाभियानचे आयोजन केले होते.
लोकमत न्युज नेटवर्क
अलिबाग - मोदींच्या खंबीर नेतृत्वामुळे आपला देश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. २०३० सालापर्यंत दरडोई उत्पन्नात आपला देश जगात तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तो पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांना आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे असे अवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.
अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी हाॅलवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड व एकात्मित आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्यावतीने प्रधानमंत्री जनजात आदिवासी न्याय महाभियानचे आयोजन केले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून तर केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होत.
आदिवासी व कातकरी बांधवांवर मोदींचे अधिक प्रेम असून त्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्रसरकार विविध योजना आखून त्या लाभार्थांपर्यंत पोहवित आहे. तळागाळीतील वाड्यावर अधिखाऱ्यांमार्फत या योजना पोहोचतात की नाही हे पाण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आम्हा मंत्र्यांना पाठवून कार्यक्रम घेऊन लाभार्थ्यांपर्यंत त्यांचे लाभ पोहोचवित आहोत. लाभ पोहोचवित असताना त्यांच्या चोहऱ्यावरील स्मित हास्य आनंद देऊन जात असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४० कोटी जनतेला ५४ योजना दिल्या आहेत. तर दुसरीकडे ८० कोटी नागरीकांना धान्य मोफत दिले आहे. त्यासाठी साडेतीन लाख कोटी खर्च येत आहे. आयुष्मान भारत योजना, उज्वला गॅस योजना, मोफत घरांची योजना, नळ पाणी योजना अशा योजनांचा लोकांना लाभ मिळतोय. लोकांमध्ये जाऊन या योजनांची माहिती सांगा. त्याची लाभार्थीना जाणीव करुन द्या. फक्त नुसती चर्चा न करता आपण काम केले पाहिजे असा सल्ला वजा समज हि अधिकारी वर्गाला नारायण याणे यांनी दिली.