केंद्र सरकारने ‘खेलो इंडिया’च्या निधीसाठी हात सैल करावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 12:23 AM2021-01-06T00:23:01+5:302021-01-06T00:23:10+5:30

आदिती तटकरे यांची मागणी

The central government should lend a hand to fund 'Khelo India' | केंद्र सरकारने ‘खेलो इंडिया’च्या निधीसाठी हात सैल करावा 

केंद्र सरकारने ‘खेलो इंडिया’च्या निधीसाठी हात सैल करावा 

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : मागील वर्षी 'खेलो इंडिया'च्या माध्यमातून भरविण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने अव्वल स्थान पटकाविले होते. केंद्र सरकारने या वर्षी महाराष्ट्र राज्यासाठी भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी क्रीडा राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी येथे केली. खोपोली येथे कुस्ती महर्षी भाऊ कुंभार संकुलाचे उद्घाटन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी पार पडले. त्यावेळी प्रसंगी त्या बोलत होत्या.
केंद्र सरकारने २०१७-१८ च्या प्रस्तावांनाच मान्यता देऊ, असे राज्य सरकारला कळविले आहे. राज्यात मागील काही वर्षांत चांगले खेळाडू निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. केंद्राकडून ''खेलो इंडिया''अंतर्गत महाराष्ट्र राज्याला चांगला निधी मिळावा, महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त प्रस्तावांना मंजुरी मिळावी, यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्र सरकारकडे भक्कम बाजू मांडून पाठपुरावा करावा, अशी विनंती तटकरे यांनी केली.
राज्यात इतर महसुली विभागांचे क्रीडा संकुल निर्माण हाेत आहेत. मात्र कोकण विभागाचे क्रीडा संकुल नाही. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे कोकण विभागीय क्रीडा संकुलाला मंजूरी दिली आहे. तीस एकर जागा हस्तांतरितही करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तालुकास्तरीय क्रीडा संकुलासाठी या पूर्वीचे सरकार एक कोटी रुपये देत होते, त्या निधीमध्ये भरीव तरतूद करीत या वर्षापासून पाच कोटी रुपयांचा निधी तालुका क्रीडा संकुलासाठी देण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी केली. क्रीडा व युवक कल्याण विभाग स्वतंत्र करण्याच्या मागणीलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, खोपोली नगराध्यक्षा सुमन 
औसरमल स्थानिक खेळाडू आदी मान्यवर उपस्थित होते.

भाऊसाहेब कुंभार यांचे कुस्तीसाठी योगदान - थोरवे
n मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी कुस्ती महर्षी खाशाबा जाधव व खोपोलीचे भाग्यविधाते भाऊ कुंभार यांच्या कार्याचा गौरव करीत भाऊ कुंभार यांच्याबरोबर माझे व्यक्तीगत मित्रत्वाचे संबंध होते आणि आमची अनेकदा भेटही झाली असल्याचे सांगितले. 
n आमदार महेंद्र थोरवे यांनी भाऊसाहेब कुंभार यांनी आयुष्याचे योगदान रायगडातील कुस्तीसाठी दिले, त्यांच्या कार्यातून महाराष्ट्र पातळीवर मोठमोठे कुस्तीपटू तयार झाल्याचे सांगितले.

Web Title: The central government should lend a hand to fund 'Khelo India'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.