कें द्र सरकारकडे नुकसानीची योग्य मांडणी करावी लागेल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 05:31 AM2020-06-10T05:31:59+5:302020-06-10T08:02:01+5:30
शरद पवार : रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या हानीची के ली पाहणी
अलिबाग : निसर्ग चक्रीवादळाने कोकणात झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकारमार्फत योग्य ती मांडणी करावी लागेल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी स्पष्ट केले. कोकणवासीयांनो, चिंता करु नका. आपण या संकटातून बाहेर पडू, असाही विश्वास देत आवश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करण्याच्या सूचना संबंधीत विभागांना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळानेरायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात थैमान घातले होते. त्या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. रायगड जिल्ह्याला सर्वाधिक तडाखा दिला आहे. येथील शेतकरी, बागायतदार, पर्यटन व्यावसायीक आणि सर्वसामान्य नागरिकांची शरद पवार यांनी भेट घेतली. मंगळवारी त्यांनी म्हसळा, माणगाव, दिवेआगर आणि श्रीवर्धन येथील नुकसानीची पाहणी केली. पडलेली घरे, प्रार्थना स्थळे, मशिदी, मंदिर, शेती, नारळ, सुपारी, आंबा आणि काजूंच्या बागांची पवारांनी पाहणी केली.
थेट स्थानिकांशी चर्चा करून त्यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आमच्या घराची कौले, पत्रे उडाले, डोळ्यासमोर घरे जमिनदोस्त झाली. पिण्याचे पाणी नाही, गावात वीज नाही, शेती-बागायती आडवी झाली आहे खायला काहीच नाही अशी भयानक परिस्थिती नागरिकांनी पवार यांना कथन केली. त्यानंतर पवार यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
करोनाच्या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांना धान्यवाटप करण्यात आले होते. वादळामुळे ते धान्य भिजून गेले. त्या सर्वांसाठी नव्याने धान्य देता येऊ शकेल, नुकसानग्रस्त शेतकºयांना रोजगार हमी योजनेतील कामे देण्यात येतील. नुकसान झालेल्या शेतकºयांना मदत करण्यात येईल. उद्यापासून नुकसानग्रस्तांना गहू, तांदूळ आणि रॉकेलचे वितरण करण्यात येणार आहे, असे पवार यांनी सांगितले. याप्रसंगी खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी उपस्थित होते.
फलोत्पादन योजनेतील बागा उद्ध्वस्त
शरद पवार हे मुख्यमंत्री असताना श्रीवर्धन तालुक्यात फलोत्पादन योजनेअंतर्गत फळांच्या अनेक बागा विकसित करण्यात आल्या होत्या. त्या सर्वच बागा निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झाल्याची कैफीयत पवार यांच्या समोर मांडण्यात आली. आमच्यासमोर फार मोठे संकट उभे राहीले आहे, असेही बागायतदारांनी पवार यांना सांगितले.