शहरं
Join us  
Trending Stories
1
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
2
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
3
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
4
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
5
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
6
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
7
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
8
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 
9
"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा
10
Scorpio पेक्षा महागडी आहे 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत पाहून तुमचा विश्वास बसणार नाही
11
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरणार?; चर्चा रंगल्यानंतर अशोक चव्हाणांचा खुलासा
12
"राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत", रवी राणांवर भाजपच्या तुषार भारतीयांचा हल्लाबोल
13
२० हून अधिक विमानांना धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क; जयपूरमध्ये एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
14
गौरवास्पद! विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
15
IND vs NZ : टीम इंडियानं ३५६ धावांची पिछाडी भरून काढत रचला खास रेकॉर्ड; आता...
16
Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीचा मुंबईतल्या जागांचा फॉर्म्युला ठरला; अजित पवार गटाला ३ जागा तर भाजपा, शिवसेनेला...
17
आटपाडीच्या ओढ्याला ५०० च्या जुन्या-नव्या नोटांचा पूर आला; नागरिकांनी लुटल्या लाखोंच्या नोटा
18
जाहीर सभेत राहुल गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य, भाजप आमदारावर गुन्हा दाखल
19
Karva Chauth 2024: द्रौपदीनेही पांडवांसाठी केले होते करवा चौथ व्रत; वाचा व्रताचे महाभारत कनेक्शन!
20
डिसेंबरमध्येही कार-होम लोन स्वस्त होणार का? RBI गव्हर्नरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

कें द्र सरकारकडे नुकसानीची योग्य मांडणी करावी लागेल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 5:31 AM

शरद पवार : रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या हानीची के ली पाहणी

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळाने कोकणात झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकारमार्फत योग्य ती मांडणी करावी लागेल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी स्पष्ट केले. कोकणवासीयांनो, चिंता करु नका. आपण या संकटातून बाहेर पडू, असाही विश्वास देत आवश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करण्याच्या सूचना संबंधीत विभागांना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळानेरायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात थैमान घातले होते. त्या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. रायगड जिल्ह्याला सर्वाधिक तडाखा दिला आहे. येथील शेतकरी, बागायतदार, पर्यटन व्यावसायीक आणि सर्वसामान्य नागरिकांची शरद पवार यांनी भेट घेतली. मंगळवारी त्यांनी म्हसळा, माणगाव, दिवेआगर आणि श्रीवर्धन येथील नुकसानीची पाहणी केली. पडलेली घरे, प्रार्थना स्थळे, मशिदी, मंदिर, शेती, नारळ, सुपारी, आंबा आणि काजूंच्या बागांची पवारांनी पाहणी केली.थेट स्थानिकांशी चर्चा करून त्यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आमच्या घराची कौले, पत्रे उडाले, डोळ्यासमोर घरे जमिनदोस्त झाली. पिण्याचे पाणी नाही, गावात वीज नाही, शेती-बागायती आडवी झाली आहे खायला काहीच नाही अशी भयानक परिस्थिती नागरिकांनी पवार यांना कथन केली. त्यानंतर पवार यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.करोनाच्या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांना धान्यवाटप करण्यात आले होते. वादळामुळे ते धान्य भिजून गेले. त्या सर्वांसाठी नव्याने धान्य देता येऊ शकेल, नुकसानग्रस्त शेतकºयांना रोजगार हमी योजनेतील कामे देण्यात येतील. नुकसान झालेल्या शेतकºयांना मदत करण्यात येईल. उद्यापासून नुकसानग्रस्तांना गहू, तांदूळ आणि रॉकेलचे वितरण करण्यात येणार आहे, असे पवार यांनी सांगितले. याप्रसंगी खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी उपस्थित होते.फलोत्पादन योजनेतील बागा उद्ध्वस्तशरद पवार हे मुख्यमंत्री असताना श्रीवर्धन तालुक्यात फलोत्पादन योजनेअंतर्गत फळांच्या अनेक बागा विकसित करण्यात आल्या होत्या. त्या सर्वच बागा निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झाल्याची कैफीयत पवार यांच्या समोर मांडण्यात आली. आमच्यासमोर फार मोठे संकट उभे राहीले आहे, असेही बागायतदारांनी पवार यांना सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारcycloneचक्रीवादळRaigadरायगड