सभापतींची ३ एप्रिलला निवड
By Admin | Published: March 23, 2017 01:39 AM2017-03-23T01:39:42+5:302017-03-23T01:39:42+5:30
मंगळवारी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अदिती तटकरे, तर उपाध्यक्षपदी अॅड. आस्वाद पाटील विराजमान झाले आहेत.
अलिबाग : मंगळवारी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अदिती तटकरे, तर उपाध्यक्षपदी अॅड. आस्वाद पाटील विराजमान झाले आहेत. आता सभापतींच्या निवडीकरिता सर्व सदस्यांच्या बैठकीचे आयोजन सोमवार, ३ एप्रिल २०१७ रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या ना. ना. पाटील सभागृहात करण्यात आले आहे.
विषय समिती सभापतीपदासाठी नामनिर्देशन दाखल करण्याकरिता ३ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. ते दुपारी १ वाजेपर्यंत मुदत राहणार असून, विषय समिती सभापतीपदाच्या निवडीसाठी बैठक दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली आहे.नामनिर्देशन पत्रांची छाननी पूर्ण झाल्यानंतर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरिता मुदत राहील अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.