कोंकण पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता; कॉंग्रेसचे बंडखोर नागेश निमकर यांचा प्रचारात जोर 

By वैभव गायकर | Published: June 22, 2024 05:05 PM2024-06-22T17:05:00+5:302024-06-22T17:07:56+5:30

कोंकण पदवीधर मतदार संघाची निवडणुक अंतिम टप्प्यात आली आहे.

chance of a three way fight in konkan graduate constituency congress rebel nagesh nimkar campaigning  | कोंकण पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता; कॉंग्रेसचे बंडखोर नागेश निमकर यांचा प्रचारात जोर 

कोंकण पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता; कॉंग्रेसचे बंडखोर नागेश निमकर यांचा प्रचारात जोर 

वैभव गायकर,पनवेल: कोंकण पदवीधर मतदार संघाची निवडणुक अंतिम टप्प्यात आली आहे. दि.२६ रोजी याकरिता मतदान होणार आहे.एकूण १३ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.भाजप महायुतीचे निरंजन डावखरे आणि कॉग्रेस महाविकास आघाडीचे रमेश किर यांच्यात जरी मुख्य लढत असली तरी कॉग्रेसचे बंडखोर नागेश निमकर यांनी प्रचाराचा जोर वाढवल्याने हि लढत तिरंगी रंगण्याची शक्यता आहे.

कोकण पदवीधर मतदार संघात सर्वाधिक मतदार ठाणे जिल्ह्यात आहेत.२ लाख २३ हजार २२५ मतदार या मतदार संघात आहेत.यापैकी महिला ९५ हजार ५४७ तर पुरुष मतदार १ लाख २७ हजार ६५० मतदार आहेत. २८ तृतीयपंथी मतदार या मतदार संघात आहेत.कॉग्रेसचे बंडखोर नागेश निमकर यांनी देखील प्रचारात जोर वाढवला आहे.भिवंडी कॉग्रेसचे पदाधिकारी असलेल्या निमकर यांनी पक्षाकडून उमेदवारी मागितली होती.मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली असल्याने निमकर हे अपक्ष या निवडणुकीत उतरले आहेत.याकरिता त्यांनी स्वतः मतदार संघ पिंजून काढला आहे.

दि.२१ रोजी निमकर यांनी पनवेल मध्ये प्रचार केला. यावेळी त्यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या भाजपचे या मतदार संघातील आमदार निरंजन डावखरे यांच्यावर टीका केली.निरंजन डावखरे या मतदार संघात केवळ निवडणुकी पुरतेच फिरतात असा आरोप केला.आजवर जवळपास ३६ कोटींचा आमदार निधी त्यांना मिळाला आहे. मात्र त्यांनी केलेल्या एकही विकासकामांचा फलक या मतदार संघात नजरेस पडत नसल्याचे सांगितले.तर कॉग्रेसचे उमेदवार रमेश किर हे वयस्कर असल्याने ते मतदारांच्या पसंतीला पडत नसल्याचे निमकर म्हणाले.मी पदवीधरांसाठी काही धोरणे आखली आहेत.प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचविण्याचे काम ते सध्या करीत असुन मतदारांचा चांगला प्रतिसाद मला मिळत असल्याचे निमकर यावेळी म्हणाले.पनवेल तालुक्यात १५ हजार ६७५ पदवीधर मतदार आहेत.पनवेल मध्ये नावाजलेल्या शिक्षण संस्था आहेत.शिक्षणाचा बाजार याठिकाणी मांडला असून या संस्थांवर देखील लोकप्रतिनिधींचे वचक नसल्याचे निमकर म्हणाले.

जिल्हा निहाय मतदार -

१) ठाणे        

पुरुष  -   ५६,३७१

महिला  - ४२,४७८

तृतीय पंथी - ११

२) पालघर    

पुरुष   -   १५,९३०  

महिला -  १२,९८७

तृतीय पंथी - ०८

३) रायगड     

पुरुष   - ३०,८४३

महिला - २३,३५६

तृतीय पंथी-  ०९

४) रत्नागिरी  

पुरुष   - १३,४५३    

महिला- ९,२२८

५) सिंधुदुर्ग   

पुरुष   -   ११,०५३

महिला    - ७,९४८

एकुण - २ लाख  २३ हजार २२५

पुरुष   -   १,२७,६५०

महिला    - ९५,५४७

तृतीय पंथी- २८ 

निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार -

१) काँग्रेस पक्षाचे रमेश कीर रमेश,

२) भारतीय जनता पक्षाचे निरंजन डावखरे, 

३) भीमसेना पार्टीचे विश्वजित खंडारे

४) अपक्ष नागेश निमकर, अमोल पवार, अरुण भोई (प्राचार्य), अक्षय म्हात्रे, गोकुळ पाटील, जयपाल पाटील,, प्रकाश वड्डेपेल्ली, मिलिंद पाटील,ॲड. शैलेश वाघमारे, श्रीकांत कामुर्ती

Web Title: chance of a three way fight in konkan graduate constituency congress rebel nagesh nimkar campaigning 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.