कर्जत-चौक रस्त्यालगत पावसामुळे भूस्खलन, टेकडीवरील वृक्षांची मुळे उघडी पडल्याने अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 03:38 AM2017-09-28T03:38:34+5:302017-09-28T03:38:38+5:30
नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे कर्जत-चौक रस्त्यालगत असलेल्या टेकडीचे भूस्खलन होऊन दरड कोसळली आहे.
नेरळ : नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे कर्जत-चौक रस्त्यालगत असलेल्या टेकडीचे भूस्खलन होऊन दरड कोसळली आहे. त्यामुळे या रस्त्यालगतच्या उंच टेकडीवरील झाडांची मुळे उघडी पडल्याने कधीही हे महाकाय वृक्ष या रस्त्यावरून ये-जा करणाºया गाड्यांवर पडून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनखाते बघ्याची भूमिका घेत असल्याने प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कर्जतहून चारफाट्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर सरळ रस्ता चौककडे तर तेथूनच वळण घेवून दुसरा रस्ता पळसदरी मार्गे खोपोलीकडे जातो. याच ठिकाणी कर्जत चारफाट्याकडून चौककडे जाताना उजव्या बाजूला उंच टेकड्या आणि त्यावर घनदाट वनराई आहे. मुसळधार पावसामुळे या टेकडीची धूप होऊन ती दोन ठिकाणी खचली आहे. त्या टेकडीच्या कडेवरील झाडाची मुळे उघडी होऊन ती झाडे कधीही रस्त्याच्या दिशेने कोसळण्याच्या स्थितीत आहेत. वृक्षांची उंची अधिक असल्याने हे वृक्ष कोसळल्यास या रस्त्यावरून जाणाºया गाड्यांवर वृक्ष पडून अपघात होण्याची तसेच वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो.
काही वर्षांपूर्वीही अशाच अतिवृष्टीमुळे कर्जत रेल्वे स्थानकालगत असलेल्या टेकडीचे भूस्खलन होऊन या टेकडीच्या पायथ्याशी असणाºया रेल्वेरु ळालगत दरड कोसळली होती. पुढील संभाव्य धोका ओळखून त्यावेळेस ज्या ठिकाणी भूस्खलन झाले तेथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून मातीची धूप थांबविण्याचा प्रयत्न केला आहे. तो काही अंशी यशस्वीही झाला आहे. त्याच धर्तीवर नुकत्याच भूस्खलन झालेल्या टेकडीवरही वृक्षारोपण करावे, अशीही मागणी होत आहे.
कर्जतमधील काही टेकड्यांवर खडी काढण्याचे क्र शर आहे. यामुळेही टेकड्यांची धूप होत आहे. टेकड्यांमधील खडक फोडण्यासाठी अनेक वेळा सुरु ंगाचा वापर केला जातो. यामुळेही टेकडीला हादरे बसून टेकडीची माती खिळखिळी होऊन भूस्खलनाचे प्रकार घडतात. तसेच वाढत्या फार्महाऊस संस्कृतीमुळे काही फार्महाऊसधारकांनी खरेदी केलेल्या शेकडो एकर जमिनीतील सपाटीकरणास आड येणारी टेकडी आधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने नामशेष करीत आहेत.
- अजय पाटील, पर्यावरणप्रेमी