चंद्रकांत पाटील यांनी केले ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2023 11:33 AM2023-08-15T11:33:49+5:302023-08-15T11:34:08+5:30

रायगड येथील मुख्य ध्वजारोहण सोहळा सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी पार पडला. ना. चंद्रकांत पाटील यांनी ध्वजारोहण केले.

Chandrakant Patil hoisted the flag in raigad | चंद्रकांत पाटील यांनी केले ध्वजारोहण

चंद्रकांत पाटील यांनी केले ध्वजारोहण

googlenewsNext

लोकमत न्युज नेटवर्क
अलिबाग : भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ वा वर्धापन दिनानिमित्त रायगड पोलीस परेड मैदानावर उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ध्वजारोहण केले. ध्वजारोहण सोहळ्यानंतर राष्ट्रपती पुरस्कार पोलीस अधिकारी, खेळाडू, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांचा अभिष्टचिंतन सोहळा ना चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडला. मुख्य ध्वजारोहण सोहळ्याला मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रायगड येथील मुख्य ध्वजारोहण सोहळा सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी पार पडला. ना. चंद्रकांत पाटील यांनी ध्वजारोहण केले. यावेळी जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती काळात जिल्हा प्रशासनाने केलेल्या कार्याचे कौतुक करून जिल्ह्यातील विकास साधण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे ना. चंद्रकांत पाटील यांनी ग्वाही दिली. सोहळ्यानंतर पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे सत्कार ना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थी यांनाही पुरस्कार देताना त्याच्याकडून आपल्या केलेल्या कार्याबाबत माहिती जाणून घेतले.

लहानग्यांना चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट वाटप केले. उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक याच्या कुटुंबीय आणि मान्यवर यांची भेट यावेळी घेतली. पोलिसांनी उभारलेल्या सेल्फी पॉईंट वर उभे राहून ना पाटील यांनी सेल्फी काढली. ना. चंद्रकांत पाटील यांनी सर्व रायगडकराना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Web Title: Chandrakant Patil hoisted the flag in raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.