जयंत धुळप
अलिबाग - मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे कोकणवासीयांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर "वाय "दर्जाच्या प्रचंड सुरक्षा व्यवस्थेत राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सकाळी 9 वाजता पनवेलकडून महाडकडे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा पाहणी दौरा सुरू केला आहे.
अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येवून ठेपला आहे. सुमारे 15 लाख चाकरमानी गणेशभक्त विविध वाहनांतून कोकणात येत असतात अशा परिस्थितीत महामार्गाची नेमकी काय दुरुस्ती करणार हा प्रश्न कोकणवासीयांच्या मनात आहे.
गेल्या आठवड्यात मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या त्रासाची प्रचिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः घेवून नाराजी व्यक्त केली होती. आज होत असलेल्या चंद्रकांत दादांच्या या दौऱ्याअंती खड्ड्यांचे विघ्न दुर होणार का? यांचे उत्तर मात्र काळच देवू शकणार आहे.