अलिबाग : महाड ते रायगड राष्ट्रीय महामागाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. हा मार्ग टक्केवारीत अडकला असल्याने संबंधित कामाचा ठेकेदार बदलावा आणि त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे, अशी मागणी रायगड किल्ला प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत केली.
अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी रायगड किल्ला प्राधिकरण कामात चालढकल सुरू असल्याने नाराजी व्यक्त केली. पत्रकार परिषदेआधी झालेल्या रायगड प्राधिकरण बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. रायगडात सुरू असलेल्या रोपवे चालकाच्या मनमानी कारभारावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. रायगड किल्ल्याकडे येणारा राष्ट्रीय महामार्ग हा हेरिटेज रस्ता व्हावा, अशी मागणीही छत्रपती संभाजीराजे यांनी केली.
रायगड किल्ल्याकडे येणाºया महाड-रायगड किल्ला हा राष्ट्रीय महामार्गाच्या २४ किलोमीटर रस्त्याच्या १४७ कोटींचे काम एम. बी. पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. मात्र, या रस्त्याच्या कामाला दोन वर्षे होऊनही अद्याप सुरुवात झालेली नाही. मात्र, ठेकेदारामध्ये टक्केवारी वाटण्यात आघाडी घेतली आहे. एम. बी. पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीला भेटलेले काम हे अजून दोन सब ठेकेदारांना दिले असून त्यातून साडेसोळा टक्के टक्केवारी काढण्याचे काम सुरू केले आहे. याबाबतचे ठोस पुरावे असल्याची माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच रस्त्याचे काम हे एम. बी. पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीनेच करावे, अन्यथा या कंपनीला ब्लॅक लिस्ट करावे, अशी मागणी केली. रायगड प्राधिकरण कामासाठी पुरातत्त्व विभाग कामांना मंजुरी देत नाही. मात्र, येथे सुरू असलेल्या रोपवे कंपनीला मात्र परवानगी देते, अशी दुटप्पी भूमिका खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी परखडपणे सांगितले. आम्हाला रोपवेसाठी परवनागी द्यावी, नागरिकांना आम्ही अतिशय माफक दरात सेवा देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.रायगड किल्ल्यावर पाणी, स्वच्छतागृह याची प्राथमिक सोयही करण्यात येणार आहे. लाइट आणि साँग सिस्टीम चार महिन्यांत सुरू करण्यात येणार आहे. मी आहे तोपर्यंत रायगडचे काम पूर्ण करणारच, असेही त्यांनी सांगितले.२४ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १४७ कोटीच्रायगड किल्याकडे येणाºया महाड-रायगड किल्ला हा राष्ट्रीय महामार्गाच्या २४ किलोमीटर रस्त्याच्या १४७ कोटींचे काम एम बी पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. या रस्त्याच्या कामाला दोन वर्षे होऊनही अद्याप सुरुवात झालेली नाही. मात्र, ठेकेदारामध्ये टक्केवारी वाटण्यात आघाडी घेतली आहे.