शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
8
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
9
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
10
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
12
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
13
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
14
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
15
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
16
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
17
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
18
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
19
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
20
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द

पुरात भिजलेल्या वाहनांची स्वस्तात विक्री, जाणून घ्या व्हायरल सत्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 1:56 AM

सोशल मीडियावर व्हायरल । कर्नाळा परिसरात ग्राहकांची गर्दी

पनवेल : पुरात भिजलेल्या वाहनांची स्वस्तात विक्री होत असल्याच्या अफवा पसरल्याने त्या खरेदी करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्य परिसरात ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती; परंतु ही निव्वळ अफवा असल्याचे समजताच लोकांनी हळूहळू काढता पाय घेतला. दरम्यान, त्यामुळे येथील वाहनाच्या गोडाऊनमधील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

पुरात भिजलेल्या गाड्या ४५ टक्के कमी दराने उपलब्ध असल्याचा संदेश बुधवारी व गुरुवारी सोशल मीडियावरून पनवेल परिसरात व्हायरल झाला. त्यामुळे वाहन खरेदी करू इच्छिणाºया ग्राहकांनी शुक्रवारी कर्नाळा येथील वाहनाच्या गोदामाजवळ एकच गर्दी केली. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. वाढत्या गर्दीला आवर घालण्यासाठी अखेर तेथील कर्मचाºयांनी गोदामाबाहेर फलक लावून अशा प्रकारे वाहनांचा कोणताही सेल नसल्याचे जाहीर केले. त्यानंतरही गर्दी वाढतच गेली. व्हायरल झालेल्या मेसेजबरोबर विक्रीला असलेल्या वाहनांचे फोटोही असल्याने ग्राहकांनी तेथील कर्मचाºयांवर प्रश्नांची सरबती केली. अखेर गर्दीला आवरण्यासाठी सुरक्षारक्षकांचा आधार घ्यावा लागला. त्यानंतर शनिवारी संबंधित गोदाममालकाने या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेत आमच्या माध्यमातून अशा प्रकारचा कोणताही सेल असल्याचे जाहीर केले नव्हेत, असे स्पष्टीकरण देण्यात आले.व्हॉट्स अ‍ॅपवर एका ग्रुपमध्ये मी हा मॅसेज पाहिला. पावसामुळे भिजलेली वाहने ४५ टक्के सूट देऊन मिळत असतील तर पाहवी म्हणून मी चौकशीसाठी गेलो होतो. मात्र, तिथे असा कोणताही प्रकार नसल्याचे कळाले.- किरण राऊत, पनवेल

टॅग्स :carकारpanvelपनवेलRainपाऊस