फसवणूक करणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 10:50 PM2019-07-25T22:50:57+5:302019-07-25T22:51:32+5:30
१२ पैकी सात अटकेत: खोट्या कागदपत्राद्वारे जमीन विक्री
अलिबाग : रायगड जिल्ह्यात विविध प्रकल्पांसाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक होत आहे, त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फसवणूक करण्याच्या घटना वाढत आहेत. मयत व्यक्ती, राज्याबाहेर किंवा परदेशात राहत असलेल्या व्यक्तींचे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड तयार करून जमिनींची विक्री करून खरेदीखत नोंदविणाऱ्या टोळीच्या सात आरोपींना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गजाआड केले आहे. आरोपींकडून दहा लाख ५० हजार रुपयांच्या रकमेसह गुन्ह्यासाठी वापरलेली यंत्रसामग्री केली आहे. या गुन्ह्यातील अन्य पाच जणांचा पोलीस शोध घेत आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जमीन विक्र ीच्या दोन गुन्ह्यांची उकल केली आहे. रोहा तालुक्यातील चांडगाव येथील सुशील गणेश भरतू यांच्या नावावर जागा आहे. तर शेडसई येथे ओमप्रकाश सुखीराम वसिष्ठ यांच्या नावावर जागा आहे. यापैकी सुशील गणेश भरतू हे २०१० मध्ये मयत झालेले आहेत तर ओमप्रकाश सुखीराम वसिष्ठ हे दिल्ली येथे राहतात. ते बºयाच कालावधीत ते रोहे येथे आलेले नाहीत. याबाबत गुन्ह्यातील आरोपींनी माहिती मिळवून सर्व प्रथम त्या जागांचे सातबारा उतारे, अन्य महसुली उतारे प्राप्त केले. त्यानंतर मयत सुशील भरतू व दिल्ली येथे राहणारे ओमप्रकाश वसिष्ठ यांच्या जागी आरोपींनी तोतया व्यक्ती उभ्या करून सर्व प्रथम त्यांची त्याच नावांची बनावट आधार कार्ड तयार करून घेतली. त्या बनावट नावे असणाºया आधार कार्डच्या आधारे बनावट नावे असणारी पॅन कार्ड तयार करून घेतली. त्यानंतर त्यांच्या नावावर असणारी जागा खरेदीखत नोंदवून विक्र ी केली. तसेच या व्यवहारात मिळालेल्या रकमेचे चेक वटविण्याकरिता सुशील भरतू व ओमप्रकाश वसिष्ठ यांच्याच नावांनी बनावट बँक खाती उघडून त्याद्वारे रोख रक्कम काढून घेतली.
काही कालावधीनंतर जागा खरेदी केलेल्या व्यक्तीला या व्यवहारात फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्र ार अर्ज दाखल केला. रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे अन्य ठिकाणी केल्याची शक्यता असल्याने पोलीस कसून चौकशी करत आहेत.
रायगड जिल्हा हा पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर मुंबई-पुणे या मोठ्या शहरांसाठी जवळचा असल्याने येथील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे फसवणुकीच्या घटना घडत आहेत.