शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

फसवणूक करणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 10:50 PM

१२ पैकी सात अटकेत: खोट्या कागदपत्राद्वारे जमीन विक्री

अलिबाग : रायगड जिल्ह्यात विविध प्रकल्पांसाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक होत आहे, त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फसवणूक करण्याच्या घटना वाढत आहेत. मयत व्यक्ती, राज्याबाहेर किंवा परदेशात राहत असलेल्या व्यक्तींचे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड तयार करून जमिनींची विक्री करून खरेदीखत नोंदविणाऱ्या टोळीच्या सात आरोपींना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गजाआड केले आहे. आरोपींकडून दहा लाख ५० हजार रुपयांच्या रकमेसह गुन्ह्यासाठी वापरलेली यंत्रसामग्री केली आहे. या गुन्ह्यातील अन्य पाच जणांचा पोलीस शोध घेत आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जमीन विक्र ीच्या दोन गुन्ह्यांची उकल केली आहे. रोहा तालुक्यातील चांडगाव येथील सुशील गणेश भरतू यांच्या नावावर जागा आहे. तर शेडसई येथे ओमप्रकाश सुखीराम वसिष्ठ यांच्या नावावर जागा आहे. यापैकी सुशील गणेश भरतू हे २०१० मध्ये मयत झालेले आहेत तर ओमप्रकाश सुखीराम वसिष्ठ हे दिल्ली येथे राहतात. ते बºयाच कालावधीत ते रोहे येथे आलेले नाहीत. याबाबत गुन्ह्यातील आरोपींनी माहिती मिळवून सर्व प्रथम त्या जागांचे सातबारा उतारे, अन्य महसुली उतारे प्राप्त केले. त्यानंतर मयत सुशील भरतू व दिल्ली येथे राहणारे ओमप्रकाश वसिष्ठ यांच्या जागी आरोपींनी तोतया व्यक्ती उभ्या करून सर्व प्रथम त्यांची त्याच नावांची बनावट आधार कार्ड तयार करून घेतली. त्या बनावट नावे असणाºया आधार कार्डच्या आधारे बनावट नावे असणारी पॅन कार्ड तयार करून घेतली. त्यानंतर त्यांच्या नावावर असणारी जागा खरेदीखत नोंदवून विक्र ी केली. तसेच या व्यवहारात मिळालेल्या रकमेचे चेक वटविण्याकरिता सुशील भरतू व ओमप्रकाश वसिष्ठ यांच्याच नावांनी बनावट बँक खाती उघडून त्याद्वारे रोख रक्कम काढून घेतली.काही कालावधीनंतर जागा खरेदी केलेल्या व्यक्तीला या व्यवहारात फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्र ार अर्ज दाखल केला. रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे अन्य ठिकाणी केल्याची शक्यता असल्याने पोलीस कसून चौकशी करत आहेत.

रायगड जिल्हा हा पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर मुंबई-पुणे या मोठ्या शहरांसाठी जवळचा असल्याने येथील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे फसवणुकीच्या घटना घडत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी