रासायनिक सांडपाण्याची पाइपलाइन फुटली
By admin | Published: July 23, 2015 04:01 AM2015-07-23T04:01:11+5:302015-07-23T04:01:11+5:30
पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील चांवढोलीजवळ एमआयडीसीची रासायनिक सांडपाण्याची पाइपलाइन फुटल्याने हे सांडपाणी बाजूला
मोहोपाडा : पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील चांवढोलीजवळ एमआयडीसीची रासायनिक सांडपाण्याची पाइपलाइन फुटल्याने हे सांडपाणी बाजूला असलेल्या अॅन्टोनी गॅरेज कंपनीत घुसले. जवळजवळ दोन ते तीन फूट रासायनिक सांडपाणी कंपनीत शिरल्याने कंपनीमध्ये दुर्गंधी पसरली. तसेच कंपनीमध्ये वापरामध्ये असलेल्या विहिरीतील पाणी दूषित होऊन या विहिरीमधील मासे मृत झाले. आजूबाजूच्या शेतीमध्येही हे सांडपाणी शिरल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही महिन्यांपूर्वीही एमआयडीसीची सांडपाणी वाहून नेणारी ही पाइपलाइन फुटली होती. त्यावेळीही परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले होते. ही पाइपलाइन जुनी झाली असून सांडपाण्याच्या प्रेशरमुळे अनेक ठिकाणी फुटत आहे. जीर्ण झालेली एमआयडीसीची सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी बदलण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)