नागोठणे : मुंबई - गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका चालत्या टँकरच्या इंजिनाला अचानक आग लागली. या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.टँकर चालकाच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून नागोठणे पोलीस ठाण्यात फोन करून कळविले. पोलिसांकडून तातडीने रिलायन्स, सुप्रीम पेट्रोकेम आणि रोहे एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला पाचारण केल्याने रसायनाने पेट घेतला नसल्याने भीषण प्रसंग टळला. यावेळी नागोठणे पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब दरेकर, उपनिरीक्षक रामेश्वर दराडे, संदीप पाटील यांच्यासह कर्मचारीवर्ग घटनास्थळावर दाखल होवून संभाव्य परिस्थितीवर लक्ष देवून होते. या दरम्यान महामार्गावरील वाहतूक नागोठणे - रोहे तसेच वाकण-रोहे - कोलाड मार्गे वळविण्यात आली होती. (वार्ताहर)
रसायनाच्या टँकरला आग
By admin | Published: January 09, 2016 2:12 AM