रसायनमिश्रित सांडपाणी नाल्यात

By Admin | Published: September 27, 2016 03:29 AM2016-09-27T03:29:05+5:302016-09-27T03:29:05+5:30

महाड औद्योगिक वसाहतीत रसायनमिश्रित पाण्यावर प्रक्रिया न करताच हे सांडपाणी परस्पर नाल्यात व कारखान्याबाहेर सोडण्यात येत असल्याचे प्रकार सध्या सर्रासपणे सुरू असत.

Chemically drained sewage gutters | रसायनमिश्रित सांडपाणी नाल्यात

रसायनमिश्रित सांडपाणी नाल्यात

googlenewsNext

महाड : महाड औद्योगिक वसाहतीत रसायनमिश्रित पाण्यावर प्रक्रिया न करताच हे सांडपाणी परस्पर नाल्यात व कारखान्याबाहेर सोडण्यात येत असल्याचे प्रकार सध्या सर्रासपणे सुरू असत. सोमवारी सकाळी अशाच प्रकारचे सांडपाणी प्रक्रिया न करता कारखान्याबाहेर सोडणाऱ्या केमोसॉल हेडस्ट्रीज प्रा. लि. या कारखान्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला.
कारखान्यातून लाल रंगाचे रसायनमिश्रित पाणी सोडण्यात आल्याने परिसरातील नाल्यात हे सांडपाणी तुडुंब भरल्याचे आज दिसून आले. याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात तक्रारी केल्यानंतर याबाबत कारवाई करण्यात आली.
केमोसॉल इंडस्ट्रीज प्रा. लि. हा कारखाना बंद करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याची माहिती प्रदूषण मंडळाचे उपविभागीय अधिकारी सागर औटी यांनी दिली.
दरम्यान, सांडपाण्याने तुडुंब भरलेल्या नाल्याची साफसफाई एमआयडीसीकडून केली जात नसल्याचे एमआयडीसी कारखान्याबाबत औद्योगिक क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Chemically drained sewage gutters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.