छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी; रायगडावर कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 09:05 IST2025-04-12T08:45:13+5:302025-04-12T09:05:47+5:30
Raigad: छत्रपती शिवाजी महाराजांची शनिवारी पुण्यतिथी आहे. यानिमित्त रायगडावर आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी; रायगडावर कार्यक्रम
महाड - छत्रपती शिवाजी महाराजांची शनिवारी पुण्यतिथी आहे. यानिमित्त रायगडावर आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या रायगड भेटीच्या पार्श्वभूमीवर गड आणि परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, खासदार सुनील तटकरे आदी उपस्थित राहणार आहेत.
किल्ले रायगडावर प्रथम विविध देवदेवतांचे विधीवत पूजन केल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या समाधिस्थळी पूजन केले जाईल. राजसदर ते समाधिस्थळापर्यंत महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिवभक्तांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सदस्य सुधीर थोरात यांनी केले आहे.