मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची दखल न घेतल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 01:32 AM2020-08-11T01:32:23+5:302020-08-11T01:32:35+5:30

रोहा येथे बैठक : मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आक्रमक

Chief Minister, Home Minister annoyed that the family of the victim girl was not taken care of | मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची दखल न घेतल्याने नाराजी

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची दखल न घेतल्याने नाराजी

Next

धाटाव : तांबडी घटनेतील अत्याचार व खून प्रकरणावर मराठा क्रांती मोर्चा सोमवारी प्रचंड आक्रमक झाला. राज्याच्या बहुतेक जिल्ह्यातील समन्वयकांनी रोहा येथे महत्त्वपूर्ण बैठक घेत पुढील भूमिका स्पष्ट केली. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळी अद्याप का भेट दिली नाही, असे म्हणत नेत्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली, तर तपासात दिरंगाई झाल्यास, दुर्लक्ष झाल्यास थेट मंत्रालयावर मराठा क्रांती मोर्चाचा भव्य मोर्चा निघेल. याची शासनाने दखल घ्यावी, असा इशारा राज्याचे समन्वयक संभाजी पाटील यांनी यावेळी दिला.

राज्याच्या अनेक जिल्ह्यांतील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी तांबडी गावातील पीडितेच्या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली. झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत अनेकांनी स्पष्ट भूमिका व्यक्त केली. अल्पवयीन पीडितेच्या अत्याचार प्रकरणात नक्की आरोपी किती, पोलीस प्रशासनाकडून अजून काही कागदपत्रे दिली जात नाहीत, तांबडीची क्रूर घटना ठरवून असावी, असे म्हणत १२० ब अन्वये चौकशी करण्यात यावी. प्रसंगी मंत्रालयावर मोर्चा नेऊ, मराठा समाजाची नव्याने ताकद दाखविण्याची वेळ आली आहे, अशा भावना स्थानिक पदाधिकारी व समन्वयकांनी व्यक्त केल्या.
जिल्ह्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून झाल्याची घटना घडली आणि संबंध राज्यात खळबळ उडाली. त्या घटनेवर सर्वंकष समाज मुख्यत: मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करून सबंधीत प्रकरण फास्ट ट्रकवर चालावे, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, सरकारी वकील नेमून जलद करावे, अशी मागणी केली. तांबडी प्रकरणावर मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला. अनेक जिल्ह्यांतील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तर सोमवारी अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, उस्मानाबाद, सांगली, लातूर, मुंबई, नाशिक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वकांनी रोह्यात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. बैठकीला राज्य समनवयक वीरेंद्र पवार संभाजी पाटील, रामभाऊ गायकवाड, महेश डोंगरे, सुनील नागणे, रायगड समन्वयक विनोद साबळे, सुनील पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पीडितेच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्या : तांबडी अत्याचार प्रकरण हे दुसरी कोपर्डीची घटना वाटावी असेच आहे. पीडित कुटुंब भयभीत आहे, त्यांच्यावर दबाव आणले जाते, दडपण आहे. पोलीस उपविभागीय आधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्याकडेच तपास असायला हवे होते. आरोपीला जात-धर्म नाही. आदिवासी विरुद्ध मराठा संघर्ष नको, आदिवासी शब्द टाळू या, असे बैठकीत ठरले. त्यानंतर, सर्व पदाधिकाºयांनी तांबडी येथे जाऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. दुसरीकडे कोपर्डी घटनेत दोषींना फाशी दिली असती, तर तांबडी येथे अशी घटना घडली नसती, राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी घटनास्थळी भेट द्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया समन्वयकांनी दिली. कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्या, या घटनेत काही षडयंत्र असल्यास या प्रकरणाचा मूळ सूत्रधार कोण आहे, याचाही शोध घ्यावा, असे या दरम्यान समन्वयकांकडून सांगण्यात आले.

मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा
रायगडमधील तांबडीची घटना भयानक आहे. भगिनीला न्याय मिळविण्यासाठी अधिकाºयांना भेटणे, निवेदन देणे फार उपयोगाचे नाही, थेट मंत्रालयावर मोर्चा काढू, असा इशारा नगरचे समन्वयक संभाजी पाटील यांनी दिला. अत्याचारात अजून कोणी मास्टरमाइंड आहे का? तसा संशय येत आहे, तपासावर आम्ही समाधानी नाही. तपास योग्य दिशेने झाले पाहिज, तसेच हा चोरीचा प्रकरण नाही. बलात्कार, हत्या केल्याचे आहे, मराठा विरुद्ध आदिवासी वाद वाढवू नका, असा इशारा रायगडचे समन्वयक विनोद साबळे यांनी आदिवासी नेत्यांना दिला.

Web Title: Chief Minister, Home Minister annoyed that the family of the victim girl was not taken care of

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.