शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची दखल न घेतल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 1:32 AM

रोहा येथे बैठक : मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आक्रमक

धाटाव : तांबडी घटनेतील अत्याचार व खून प्रकरणावर मराठा क्रांती मोर्चा सोमवारी प्रचंड आक्रमक झाला. राज्याच्या बहुतेक जिल्ह्यातील समन्वयकांनी रोहा येथे महत्त्वपूर्ण बैठक घेत पुढील भूमिका स्पष्ट केली. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळी अद्याप का भेट दिली नाही, असे म्हणत नेत्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली, तर तपासात दिरंगाई झाल्यास, दुर्लक्ष झाल्यास थेट मंत्रालयावर मराठा क्रांती मोर्चाचा भव्य मोर्चा निघेल. याची शासनाने दखल घ्यावी, असा इशारा राज्याचे समन्वयक संभाजी पाटील यांनी यावेळी दिला.राज्याच्या अनेक जिल्ह्यांतील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी तांबडी गावातील पीडितेच्या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली. झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत अनेकांनी स्पष्ट भूमिका व्यक्त केली. अल्पवयीन पीडितेच्या अत्याचार प्रकरणात नक्की आरोपी किती, पोलीस प्रशासनाकडून अजून काही कागदपत्रे दिली जात नाहीत, तांबडीची क्रूर घटना ठरवून असावी, असे म्हणत १२० ब अन्वये चौकशी करण्यात यावी. प्रसंगी मंत्रालयावर मोर्चा नेऊ, मराठा समाजाची नव्याने ताकद दाखविण्याची वेळ आली आहे, अशा भावना स्थानिक पदाधिकारी व समन्वयकांनी व्यक्त केल्या.जिल्ह्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून झाल्याची घटना घडली आणि संबंध राज्यात खळबळ उडाली. त्या घटनेवर सर्वंकष समाज मुख्यत: मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करून सबंधीत प्रकरण फास्ट ट्रकवर चालावे, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, सरकारी वकील नेमून जलद करावे, अशी मागणी केली. तांबडी प्रकरणावर मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला. अनेक जिल्ह्यांतील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तर सोमवारी अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, उस्मानाबाद, सांगली, लातूर, मुंबई, नाशिक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वकांनी रोह्यात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. बैठकीला राज्य समनवयक वीरेंद्र पवार संभाजी पाटील, रामभाऊ गायकवाड, महेश डोंगरे, सुनील नागणे, रायगड समन्वयक विनोद साबळे, सुनील पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.पीडितेच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्या : तांबडी अत्याचार प्रकरण हे दुसरी कोपर्डीची घटना वाटावी असेच आहे. पीडित कुटुंब भयभीत आहे, त्यांच्यावर दबाव आणले जाते, दडपण आहे. पोलीस उपविभागीय आधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्याकडेच तपास असायला हवे होते. आरोपीला जात-धर्म नाही. आदिवासी विरुद्ध मराठा संघर्ष नको, आदिवासी शब्द टाळू या, असे बैठकीत ठरले. त्यानंतर, सर्व पदाधिकाºयांनी तांबडी येथे जाऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. दुसरीकडे कोपर्डी घटनेत दोषींना फाशी दिली असती, तर तांबडी येथे अशी घटना घडली नसती, राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी घटनास्थळी भेट द्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया समन्वयकांनी दिली. कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्या, या घटनेत काही षडयंत्र असल्यास या प्रकरणाचा मूळ सूत्रधार कोण आहे, याचाही शोध घ्यावा, असे या दरम्यान समन्वयकांकडून सांगण्यात आले.मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारारायगडमधील तांबडीची घटना भयानक आहे. भगिनीला न्याय मिळविण्यासाठी अधिकाºयांना भेटणे, निवेदन देणे फार उपयोगाचे नाही, थेट मंत्रालयावर मोर्चा काढू, असा इशारा नगरचे समन्वयक संभाजी पाटील यांनी दिला. अत्याचारात अजून कोणी मास्टरमाइंड आहे का? तसा संशय येत आहे, तपासावर आम्ही समाधानी नाही. तपास योग्य दिशेने झाले पाहिज, तसेच हा चोरीचा प्रकरण नाही. बलात्कार, हत्या केल्याचे आहे, मराठा विरुद्ध आदिवासी वाद वाढवू नका, असा इशारा रायगडचे समन्वयक विनोद साबळे यांनी आदिवासी नेत्यांना दिला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Deshmukhअनिल देशमुख