शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

मुख्याधिकाऱ्यांचे धमकीवजा आदेश, कोविड चाचणी न केल्यास दंड?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 1:35 AM

प्रशासकीय पातळीवर सुरू असलेला सावळा-गोंधळ चव्हाट्यावर आल्याने प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याचे चित्र आहे.

आविष्कार देसाईरायगड : गणेशोत्सवाच्या कालावधीत दुकानदार, व्यावसायिक, भाजी विक्रे ते, फळ विक्रेते यांनी स्वखर्चाने कोविड १९ ची टेस्ट करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. मात्र त्यांच्या आवाहनाचे रूपांतर अलिबाग नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांनी धमकीवजा आदेशात केले. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये संतप्त नाराजीची भावना निर्माण झाली आहे. प्रशासकीय पातळीवर सुरू असलेला सावळा-गोंधळ चव्हाट्यावर आल्याने प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याचे चित्र आहे.मुख्याधिकाºयांनी काढलेल्या अशा पत्रामुळे विविध व्यावसायिक, व्यापारी, दुकानदार, विक्रेते यांनी ‘लोकमत’कडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर याबाबत प्रशासनाला विचारणा केल्यानंतर दिलेले पत्र मागे घेत असल्याचे मुख्याधिकारी महेश चौधरी यांनी सांगितले. कोणावरही सक्ती केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘लोकमत’ने व्यापारी, दुकानदार, दूध विक्रेते, फळ विक्रेते, भाजी विक्रेते यांच्यावरील अन्यायकारक निर्णयाविरोधात आवाज उठविल्याने धन्यवाद दिले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी सरकार आणि प्रशासन वेगवेगळे आदेश काढत होते. तसेच त्यांची अंमलबजावणी करतानाही मतभेद होत होते. सातत्याने असे प्रकार घडत असल्याने प्रशासन आणि सरकार यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर धरत सरकार आणि प्रशासनाच्या प्रतिमेला तडा जात असल्याचे अधोरेखित केले होते. महाआघाडी सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी यामध्ये हस्तक्षेप करीत यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला होता. रायगड जिल्ह्यामध्ये मात्र उलटे सुरू आहे. प्रशासनामध्येच समन्वय नसल्याचे आता समोर आले आहे.जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची परंपरा आहे. या कालावधीत मोठ्या संख्येने चाकरमानी मुंबई-पुण्यातून येणार आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. तसेच याच कालावधीत बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीसाठी गर्दी होणार हे प्रशासनाला चांगलेच ठाऊक आहे. अशा वाढत्या गर्दीमधून कोरोनाचा फैलाव जास्त वेगाने होण्याची शक्यता आहे. याच कारणासाठी सर्व दुकानदार, व्यावसायिक, फळ विक्रेते, भाजी विक्रेते, दूध विक्रेते, पेट्रोलपंप चालकांनी त्यांच्या कामगारांसह स्वत:ची अ‍ॅण्टिजेन, आरटीपीसीआर टेस्ट स्वखर्चाने तातडीने करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले होते. ‘कलेक्टर रायगड’ या अधिकृत फेसबुक पेजवर जिल्हाधिकाºयांनी केलेले आवाहन नेटकºयांना चांगलेच खटकले होते. सर्वसामान्य व्यावसायिक स्वखर्चाने टेस्ट कशी करणार, असा सवाल त्यांनी निधी चौधरी यांना विचारून चांगलेच ट्रोलकरण्यात आले होते.>जिल्हा, तालुका प्रशासनामध्ये ताळमेळच नाहीजिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबत ‘आवाहन’ केले आहे याची माहिती मुख्याधिकारी महेश चौधरी यांना नव्हती का? अथवा त्यांनी जाणूनबुजून जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला आपल्या स्तरावरून ‘धमकीवजा आदेशा’चे स्वरूप देत जिल्हाधिकारी यांचा अवमान केला का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तसेच समाज माध्यमांवर चर्चा होऊ लागली आहे. जिल्हाधिकारी आवाहन करीत असतील आणि मुख्याधिकारी टेस्टसाठी धमकीवजा आदेश देत असतील तर ते चुकीचे आहे. प्रशासनामध्ये ताळमेळ नसणे हेच यातून समोर येते, असे एका व्यावसायिकाने सांगितले. दरम्यान, याबाबत जिल्हाधिकारी निधीचौधरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.>सर्वच स्तरातून संतापाची लाटजिल्हाधिकाºयांनी याबाबतचे पत्र १४ आॅगस्ट रोजी नगरपालिका प्रशासनाला पाठविले होते. त्याचा आधार घेत अलिबागचे मुख्याधिकारी महेश चौधरी यांनी तर हद्द केली. महेश चौधरी यांनी धमकीवजा आदेश काढत सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी स्वत:सहत्यांच्या कामगारांची अ‍ॅण्टिजेन, आरटीपीसीआर टेस्ट स्वखर्चाने तातडीने करावी. जे प्रशासनाचे नियम पाळणार नाहीत त्यांनी कोणत्याही वस्तूंची विक्री करू नये; अन्यथा आपल्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे पत्र १९ आॅगस्ट रोजी काढले. मुख्याधिकारी चौधरी यांचे पत्र व्यापारी, व्यावसायिक यांच्या विविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर प्रचंड व्हायरल झाले. प्रशासनाच्या अशा धमकीवजा आदेशामुळे सर्वच स्तरातून संतापाची लाट उसळली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस