बालकांच्या तक्रारी निराकरणासाठी बालस्नेही पोलीस केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 01:42 AM2021-04-05T01:42:01+5:302021-04-05T01:42:13+5:30

अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोकणातील पहिल्या केंद्राची स्थापना

Child friendly police station for resolving children's complaints | बालकांच्या तक्रारी निराकरणासाठी बालस्नेही पोलीस केंद्र

बालकांच्या तक्रारी निराकरणासाठी बालस्नेही पोलीस केंद्र

googlenewsNext

अलिबाग : रायगड पोलिसांनी अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोकणातील पहिल्या बालस्नेही पोलीस केंद्राची स्थापना केली आहे. बालस्नेही पोलीस ठाण्यात बालकांच्या अत्याचाराचे निराकारण, पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने अलिबाग पोलीस काम करणार आहेत. जिल्ह्यात रोहा आणि कर्जत या ठिकाणीही अजून दोन बालस्नेही पोलीस केंद्र स्थापन होणार आहेत.

पोलिसांच्या साचेबद्ध कामाला फाटा देऊन समाजोपयोगी दृष्टिकोन समोर ठेवून, हे बालस्नेही पोलीस केंद्र तयार करण्यात आले आहे. बालकांवरील अत्याचाराचे निराकरण, गुन्ह्यात सापडलेल्या अल्पवयीन मुलांचे पुनर्वसन, मुलांचे समुपदेश या बालस्नेही केंद्रात केले जाणार आहे. तसेच बालकांवरील अत्याचारात वाढ होऊ नये, यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. या बालस्नेही कक्षात पोलीस कर्मचाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते, मानसोपचारतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ यांचीही मदत घेतली जाणार आहे.

बालस्नेही केंद्र अलिबाग येथे प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात आले आहे. या केंद्रामुळे बालकांना सुरक्षित वातावरण निर्माण होऊन, ते आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाच फोडू शकतील. बालस्नेही पोलीस केंद्रामुळे बालकांवर झालेल्या अत्याचाराचे निराकरण होऊन, बालकांना न्याय मिळेल. यामुळे बालकांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होऊ शकते, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बालकांच्या तक्रारींचे निराकरण या कक्षात केले जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून राबवलेल्या या उपक्रमाचे लवकरच लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांनी दिली.

 

Web Title: Child friendly police station for resolving children's complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.