जिल्ह्यात मत्स्यशेतीला तरु णांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:34 AM2017-08-02T02:34:22+5:302017-08-02T02:34:22+5:30

शेती करताना मजूर, पीक खर्च व मिळणारे उत्पन्न यांचे गणित जुळवल्यास शेतकºयांना फारसा नफा होताना दिसत नाही. शेतीला पर्याय म्हणून मत्स्यशेती करण्याला रायगड जिल्ह्यातील तरुण शेतकºयांकडून पसंती मिळत आहे. नवनवीन

The choice of young people in fish in the district | जिल्ह्यात मत्स्यशेतीला तरु णांची पसंती

जिल्ह्यात मत्स्यशेतीला तरु णांची पसंती

Next

वैभव गायकर ।
पनवेल : शेती करताना मजूर, पीक खर्च व मिळणारे उत्पन्न यांचे गणित जुळवल्यास शेतकºयांना फारसा नफा होताना दिसत नाही. शेतीला पर्याय म्हणून मत्स्यशेती करण्याला रायगड जिल्ह्यातील तरुण शेतकºयांकडून पसंती मिळत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी गुंतवणुकीत अधिक फायदा मिळवण्यावर भर दिला जात आहे.
मत्स्यशेतीला चालना देण्यासाठी नीलक्रांतीसारख्या योजना राबविल्या जात आहेत. पनवेल येथील खार जमीन संशोधन केंद्रात नजीकच्या काळात मत्स्यशेतीविषयक माहिती मिळविण्यासाठी रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागातील शेतकरी भेट देत आहेत.
इस्रायल, चीन, व्हिएतनाम या देशांच्या तुलनेत भारतात प्रगत मत्स्यशेती अद्याप केली जात नाही. महाराष्ट्रातदेखील भारताच्या एकूण मत्स्य उत्पादनाच्या केवळ ६ टक्के मत्स्यशेती केली जाते. समुद्रातील मासेमारीत संपूर्ण जगात भारताचा सातवा क्रमांक लागतो. शासनाच्या अन्न आणि कृषी संस्थेने (एफएवो) २०१४-१५च्या दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे सागरी मत्स्योत्पादन ४ लाख टन एवढे आहे. यामध्ये भूजल (गोड्या पाण्यातील) मत्स्योत्पादन दीड लाख टन एवढे आहे. ही आकडेवारी भारताच्या एकूण मत्स्योत्पादनाच्या केवळ ६ टक्के असल्याने महाराष्ट्रात मत्स्यशेतीला चालना मिळण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविल्या जात
आहेत. मत्स्योत्पादन वाढविणे, हा यामागचा उद्देश असून महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र पनवेलमध्ये आहे. केंद्रातच मत्स्यशेती व्यवसाय करण्यासाठी उत्सुक उद्योजकांना प्रशिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे, मत्स्यबीजाचीही या ठिकाणी विक्री केली जात असल्याने नजीकच्या काळात या संशोधन केंद्राला भेट देणाºयांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जानेवारी २०१७ ते जुलै महिन्यांपर्यंत या संशोधन केंद्राला ५००पेक्षा जास्त शेतकºयांनी भेट देऊन मत्स्यशेतीविषयक प्रशिक्षण सहभाग घेतला. प्रशिक्षण घेतलेल्या शेतकºयांपैकी ८० टक्के शेतकºयांनी मत्स्यशेती व्यवसायाला सुरुवातही केली आहे.
एकेकाळी रायगड जिल्ह्याला भात शेतीचे भांडार म्हणून संबोधले जायचे. मात्र, लोकवस्ती वाढल्याने तसेच विविध आंतरराष्टÑीय प्रकल्प परिसरात होऊ घातल्याने शेतजमीन कमी झाली. शिवाय गुंतवणुकीच्या तुलनेत उत्पन्नही मिळत नसल्याने अनेकांनी शेतीकडे पाठ फिरवली.
गेल्या दीड-दोन वर्षांपासून जिल्ह्यात मत्स्यशेतीला चालना मिळत आहे. तरुण शेतकºयांमध्ये मत्स्यशेतीचे विशेष आकर्षण असून ते मोठ्या प्रमाणात याकडे वळत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे रायगड जिल्ह्यात शेततळ्यांची संख्या हजारोवर पोहोचली आहे. रायगड जिल्ह्यात संशोधन केंद्राच्या नोंदीनुसार ३००० तळ्यांवर मत्स्यशेती केली जाते. यामध्ये पेण तालुक्यात सर्वात जास्त मत्स्यशेती केली जाते.
जिल्ह्यातील नोंदणीकृत ३००० तलावांपैकी १२०० तलाव पेणमध्ये आहेत. पनवेल तालुक्यात ५०० नोंदणीकृत तलाव आहेत. या व्यतिरिक्त संशोधन केंद्रात नोंद नसलेल्या हजारो तलावांतदेखील मत्स्यशेती मोठ्या प्रमाणात केली जाते.
आधुनिक पद्धतीने मत्स्यशेती केल्यास एक किलोचा मासा तयार करण्यासाठी ६० रु पये एवढा अंदाजित खर्च येतो. बाजारात किरकोळ विक्री केल्यास या एका माशामागे १५० रु पये प्रतिकिलो बाजारभाव मिळतो. म्हणजेच शेतकºयाला एका माशामागे ९० रु पये नफा मिळतो. १० गुंठ्याच्या तलावात एक टन उत्पादन निघू शकते. शास्त्रोक्त पद्धतीने मत्स्यशेती केल्यास यामधून एक लाख उत्पादन मिळते. म्हणजेच शेतकºयाला १०
गुंठ्यातून सुमारे ९० हजार एवढा
नफा अवघ्या ९ महिन्यांच्या कालावधीत मिळू शकते. मात्र, यासाठी मत्स्यशेती तंत्रज्ञान, मत्स्यपालन व्यवसायातील तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे.

Web Title: The choice of young people in fish in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.