शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

जिल्ह्यात मत्स्यशेतीला तरु णांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:34 AM

शेती करताना मजूर, पीक खर्च व मिळणारे उत्पन्न यांचे गणित जुळवल्यास शेतकºयांना फारसा नफा होताना दिसत नाही. शेतीला पर्याय म्हणून मत्स्यशेती करण्याला रायगड जिल्ह्यातील तरुण शेतकºयांकडून पसंती मिळत आहे. नवनवीन

वैभव गायकर ।पनवेल : शेती करताना मजूर, पीक खर्च व मिळणारे उत्पन्न यांचे गणित जुळवल्यास शेतकºयांना फारसा नफा होताना दिसत नाही. शेतीला पर्याय म्हणून मत्स्यशेती करण्याला रायगड जिल्ह्यातील तरुण शेतकºयांकडून पसंती मिळत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी गुंतवणुकीत अधिक फायदा मिळवण्यावर भर दिला जात आहे.मत्स्यशेतीला चालना देण्यासाठी नीलक्रांतीसारख्या योजना राबविल्या जात आहेत. पनवेल येथील खार जमीन संशोधन केंद्रात नजीकच्या काळात मत्स्यशेतीविषयक माहिती मिळविण्यासाठी रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागातील शेतकरी भेट देत आहेत.इस्रायल, चीन, व्हिएतनाम या देशांच्या तुलनेत भारतात प्रगत मत्स्यशेती अद्याप केली जात नाही. महाराष्ट्रातदेखील भारताच्या एकूण मत्स्य उत्पादनाच्या केवळ ६ टक्के मत्स्यशेती केली जाते. समुद्रातील मासेमारीत संपूर्ण जगात भारताचा सातवा क्रमांक लागतो. शासनाच्या अन्न आणि कृषी संस्थेने (एफएवो) २०१४-१५च्या दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे सागरी मत्स्योत्पादन ४ लाख टन एवढे आहे. यामध्ये भूजल (गोड्या पाण्यातील) मत्स्योत्पादन दीड लाख टन एवढे आहे. ही आकडेवारी भारताच्या एकूण मत्स्योत्पादनाच्या केवळ ६ टक्के असल्याने महाराष्ट्रात मत्स्यशेतीला चालना मिळण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविल्या जातआहेत. मत्स्योत्पादन वाढविणे, हा यामागचा उद्देश असून महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र पनवेलमध्ये आहे. केंद्रातच मत्स्यशेती व्यवसाय करण्यासाठी उत्सुक उद्योजकांना प्रशिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे, मत्स्यबीजाचीही या ठिकाणी विक्री केली जात असल्याने नजीकच्या काळात या संशोधन केंद्राला भेट देणाºयांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जानेवारी २०१७ ते जुलै महिन्यांपर्यंत या संशोधन केंद्राला ५००पेक्षा जास्त शेतकºयांनी भेट देऊन मत्स्यशेतीविषयक प्रशिक्षण सहभाग घेतला. प्रशिक्षण घेतलेल्या शेतकºयांपैकी ८० टक्के शेतकºयांनी मत्स्यशेती व्यवसायाला सुरुवातही केली आहे.एकेकाळी रायगड जिल्ह्याला भात शेतीचे भांडार म्हणून संबोधले जायचे. मात्र, लोकवस्ती वाढल्याने तसेच विविध आंतरराष्टÑीय प्रकल्प परिसरात होऊ घातल्याने शेतजमीन कमी झाली. शिवाय गुंतवणुकीच्या तुलनेत उत्पन्नही मिळत नसल्याने अनेकांनी शेतीकडे पाठ फिरवली.गेल्या दीड-दोन वर्षांपासून जिल्ह्यात मत्स्यशेतीला चालना मिळत आहे. तरुण शेतकºयांमध्ये मत्स्यशेतीचे विशेष आकर्षण असून ते मोठ्या प्रमाणात याकडे वळत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे रायगड जिल्ह्यात शेततळ्यांची संख्या हजारोवर पोहोचली आहे. रायगड जिल्ह्यात संशोधन केंद्राच्या नोंदीनुसार ३००० तळ्यांवर मत्स्यशेती केली जाते. यामध्ये पेण तालुक्यात सर्वात जास्त मत्स्यशेती केली जाते.जिल्ह्यातील नोंदणीकृत ३००० तलावांपैकी १२०० तलाव पेणमध्ये आहेत. पनवेल तालुक्यात ५०० नोंदणीकृत तलाव आहेत. या व्यतिरिक्त संशोधन केंद्रात नोंद नसलेल्या हजारो तलावांतदेखील मत्स्यशेती मोठ्या प्रमाणात केली जाते.आधुनिक पद्धतीने मत्स्यशेती केल्यास एक किलोचा मासा तयार करण्यासाठी ६० रु पये एवढा अंदाजित खर्च येतो. बाजारात किरकोळ विक्री केल्यास या एका माशामागे १५० रु पये प्रतिकिलो बाजारभाव मिळतो. म्हणजेच शेतकºयाला एका माशामागे ९० रु पये नफा मिळतो. १० गुंठ्याच्या तलावात एक टन उत्पादन निघू शकते. शास्त्रोक्त पद्धतीने मत्स्यशेती केल्यास यामधून एक लाख उत्पादन मिळते. म्हणजेच शेतकºयाला १०गुंठ्यातून सुमारे ९० हजार एवढानफा अवघ्या ९ महिन्यांच्या कालावधीत मिळू शकते. मात्र, यासाठी मत्स्यशेती तंत्रज्ञान, मत्स्यपालन व्यवसायातील तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे.