उरण : एमएमआरडीएच्या प्रस्तावित प्रकल्पाचा निषेध म्हणून २५ सप्टेंबर रोजी साजरा झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ८७ वा हुतात्मा स्मृतिदिन हुतात्मांना दिलेली शासकीय मानवंदना वगळता साधेपणाने साजरा करण्यात आला.उरणच्या ग्रामीण भागातील नागरिक, शेतकºयांवरील संकटाची मालिका अद्याप सुरुच आहे. मागील काही वर्षापूर्वी महामुंबई सेझचे संकट उरण, पनवेल, पेणच्या ग्रामीण भागावर आले होते. बड्या भांडवलदारांसाठी महामुंबई सेझच्या पायघड्या घालण्यासाठी १० हजार हेक्टर जमीन अल्पदरात संपादन करण्याचा घाट सरकारने घातला होता. मात्र शेतकºयांच्या अभेद्य एकजुटीने दिलेल्या लढ्यामुळे महामुंबई सेझ हद्दपार करण्यात येथील शेतकºयांना यश आले. महामुंबई सेझचे भूत मानगुटीवरुन उतरत नाही तोच आता उरण ग्रामीण भागातील जनतेच्या मानगुटीवर सरकारने एमएमआरडीएचा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न सरकारने सुरु केला आहे. शेतकºयांनी याआधीच या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. आधी चर्चा, बैठका, मागण्या, पुनर्वसन, गावठाण विस्तार आणि शेतकºयांबरोबर सहमतीचा निर्णय त्यानंतरच प्रकल्प असा इशाराच शेतकºयांनी शासनाला दिला आहे.दरवर्षी चिरनेर येथे २५ सप्टेंबर रोजी चिरनेर जंगल सत्याग्रहाचा हुतात्मा स्मृती दिन साजरा करण्यात येतो. या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहिली जाते. त्यांच्या वारसांचा सत्कारही याप्रसंगी केला जातो. मात्र यावर्षी चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या हुतात्मा दिनावर प्रस्तावित एमएमआरडीए सावटाखाली साजरा करण्यात आला. त्यामुळे दरवर्षी हुतात्मांच्या नातेवाईकांचा होणारा सत्कारही झाला नाही. त्यामुळे नेते, पुढाºयांचीही भाषणेही झाली नाहीत. केवळ शासकीय मानवंदनेचा कार्यक्रम सोपस्कार म्हणून उरकला.या कार्यक्रमाप्रसंगी उरणचे आमदार मनोहर भोईर, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार विवेक पाटील, उरण पंचायत समितीचे सभापती नरेश घरत, उपसभापती वैशाली पाटील आदी उपस्थित होते.- या कार्यक्रमासाठी शासनाकडून राजिप मार्फत दिला जाणारा निधीही नाकारुन साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थ आणि चिरनेर ग्रामपंचायतीने याआधीच जाहीर केला होता.यावर्षी चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या हुतात्मा दिनावर प्रस्तावित एमएमआरडीए सावटाखाली साजरा करण्यात आला. त्यामुळे हुतात्मांच्या नातेवाईकांचा होणारा सत्कारही झाला नाही. केवळ शासकीय मानवंदनेचा कार्यक्रम सोपस्कार म्हणून उरकला.
चिरनेर जंगल सत्याग्रह हुतात्मा स्मृतिदिन साधेपणाने साजरा, शासकीय मानवंदना, एमएमआरडीए प्रकल्पाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 4:07 AM