80 गायी आणि 20 वासरं असलेल्या नंदिनी गोशाळेवर सिडकोची कारवाई 

By वैभव गायकर | Published: August 23, 2023 06:51 PM2023-08-23T18:51:28+5:302023-08-23T18:52:35+5:30

खारघर रेल्वे स्थानकातील मागील बाजुस असलेल्या नंदिनी गोशाळेवर सिडकोने तोडक कारवाई केली आहे.

CIDCO action on Nandini Goshale with 80 cows and 20 calves |   80 गायी आणि 20 वासरं असलेल्या नंदिनी गोशाळेवर सिडकोची कारवाई 

  80 गायी आणि 20 वासरं असलेल्या नंदिनी गोशाळेवर सिडकोची कारवाई 

googlenewsNext

पनवेल : खारघर रेल्वे स्थानकातील मागील बाजुस असलेल्या नंदिनी गोशाळेवर सिडकोने तोडक कारवाई केली आहे. या गोशाळेत 80 गायी आणि 20 वासरे होती.सिडकोने ही गोशाळा हटविण्याची सूचना केली होती. यावेळी पावसाळा संपेपर्यंत गोशाळेवर कारवाई न करण्याची मुदत गोशाळेचे चालक शैलेश खोतकर यांनी मागितली होती. मात्र तरी देखील सिडकोने हि गोशाळा जमिनदोस्त केली.
      
खारघर शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे जोरात सुरु आहेत. या बांधकामांना सिडकोचे अभय मिळत आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात देखील खारघर मध्ये जोरदार बांधकामे सुरु आहेत. असे असताना सिडकोने शेकडो मुक्या जनावरांचा निवारा तोडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक आमदार प्रशांत ठाकुर यांनी देखील पावसाळ्यात गोशाळेवर कारवाई न करण्यासाठी सिडकोला पत्र लिहले होते. मात्र सिडकोने त्यांच्या पात्राकडे देखील दुर्लक्ष केले.

Web Title: CIDCO action on Nandini Goshale with 80 cows and 20 calves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.