खारघरमधील बांधकामावर सिडकोचा हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:12 PM2019-03-12T23:12:00+5:302019-03-12T23:12:17+5:30
सिडकोसह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी
Next
पनवेल : खारघर शहरातील सेक्टर ३४ ए मधील खुटुकबांधण गावाजवळील अनधिकृत बांधकामावर सिडकोने कारवाई केली. यात दोन मजली आरसीसी बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. खारघर पोलिसांसह सिडकोचा मोठा फौजफाटा घटनास्थळी उपस्थित होता.
तळमजला अधिक दोन मजले जेसीबी व पोकलेनच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. संबंधित बिल्डरला सिडकोमार्फत बांधकाम हटविण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र नोटिशीची दखल घेतली न गेल्याने मंगळवारी हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील अधिकारी विशाल ढगे यांनी दिली. कारवाईसह शहरातील इतर अनधिकृत बांधकामही यावेळी जमीनदोस्त करण्यात आले.