साईनंदन हॉलवर सिडकोचा हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:28 PM2019-07-24T23:28:40+5:302019-07-24T23:28:49+5:30
अतिक्रमण पाडले : कारवाई होत नसल्याने दाखल केली होती याचिका
पनवेल : खांदा वसाहतीतील सेक्टर १0 मधील साईनंदन कम्युनिटी हॉलवर सिडकोने बुधवारी कारवाई केली. या शॉपिंग सेंटरचे रूपांतर खाजगी कम्युनिटी सेंटरमध्ये करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याची तक्र ार डॉ. हेमंत क्षीरसागर यांनी केली होती. यासंदर्भात सिडको कारवाई करीत नसल्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली होती.
उच्च न्यायालयाने देखील याठिकाणचे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश सिडकोला दिले होते. मात्र सिडकोच्या मार्फत कारवाई होत नसल्याने क्षीरसागर यांनी राज्याच्या सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिले होते. या पत्राची प्रत क्षीरसागर यांनी सिडको अध्यक्ष, नगरविकास विभाग, सिडको व्यवस्थापकीय संचालक आदींना दिली होती. कारवाई करण्यासाठी सिडको अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला होता. अखेर सिडकोने भर पावसात जेसीबी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. २0१३ पासून डॉ. हेमंत क्षीरसागर यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला आहे. सिडकोने उभारलेले हे शॉपिंग कॉम्प्लेक्स सिडकोने लिलावात
विक्र ीसाठी काढल्यानंतर या शॉपिंग सेंटरच्या मालकाने मोठ्या प्रमाणात बांधकामात बदल केला होता. मात्र यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्या ही परवानग्या घेण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे वसाहत अधिकारी फय्याज खान यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली. अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या मार्फत वसाहत विभागाला जेसीबी तसेच मनुष्यबळ पुरविण्यात आल्याची माहिती अनधिकृत बांधकाम विभागाचे विशाल ढगे यांनी दिली.