बोर्ली मांडला : मुरुड तालुक्यातील मौजे बोर्ली येथील साने गुरुजी विद्यालयाचे मुख्यध्यापक सुरेश लक्ष्मण पवार यांच्याकडून रायगड जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डी. एल. थोरात यांनी सिगरेट आणि लायटर जप्त केले आहे. पवारांच्या मनमानी कारभाराबद्दल अनेक तक्रारी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात आल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य नंदकुमार म्हात्रे यांनी या संदर्भात माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्याकडे सुरेश पवार हे मद्यपान करून विद्यालयात येतात आणि शाळेच्या दाखल्यासाठी प्रत्येकी १०० रुपये घेत असल्याची तक्रार केली होती. त्यावर शिक्षणाधिकाºयांकडून कोणतीही कारवाई केली गेली नाही. शनिवारी सकाळी रायगड जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी थोरात यांनी अचानक विद्यालयास भेट दिली असता, मुख्याध्यापकांच्या दालनात धूम्रपान केल्याची दुर्गंधी आली. याबाबत विचारणा केली असता, पवार यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, अधिकाºयांनी ताकीद देताच पवार यांनी खिशात असलेले धूम्रपानाचे साहित्य काढून शिक्षणाधिकारी यांच्यासमोर ठेवले. या वेळी विद्यालयातील शिक्षक आणि शिकेतर कर्मचारी उपस्थित होते.त्यानंतर विद्यालयातील शिक्षकांकडे ते शिकवत असलेल्या शिक्षणाबाबत चौकशी केली असता, काही शिक्षकांनी अर्धवट उत्तरे दिली, तर काही गप्प बसले. विद्यालयाच्या दप्तराची तपासणीकरिता मागणी केली असता, दप्तर अपूर्ण असल्याने दोन ते तीन दिवसांत पूर्ण करून तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.मुख्याध्यापक सुरेश पवार यांच्याविरोधात अनेक तक्रारी प्राप्त होत्या. त्या अनुषंगाने विद्यालयास भेट दिली असता, धूम्रपान साहित्य आढळून आले. त्यांच्याविरोधात असणाºया तक्रारींची चौकशी करण्यात येईल.- डी. एल. थोरात, शिक्षणाधिकारी, (माध्यमिक विभाग), रायगड जिल्हा परिषद)पवार यांच्याकडून धूम्रपानाचे साहित्य जप्त केले आहे. त्यांनी शिष्यवृत्तीचा अपहार केला असून, सखोल चौकशी व्हावी, त्यांच्याविरोधात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे तक्र ार करणार आहे.- अमूलकुमार भलगट, सदस्य जिल्हा कार्यकरिणी
मुख्याध्यापकाकडून सिगरेट जप्त, शिक्षणाधिकाऱ्यांची तपासणी, कठोर कारवाईची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 3:51 AM