शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

आरसीएफमध्ये सुरक्षेसाठी सीआयएसएफचे मॉकड्रिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 3:06 AM

अतिरेकी कारखाना क्षेत्रात घुसल्याच्या अचानक आलेल्या या संदेशामुळे काही क्षण सीआयएसएफ कंट्रोलरूममध्ये एकदम सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले.

- जयंत धुळपअलिबाग : थळ-वायशेत येथील केंद्र सरकारचा अंगीकृत उपक्रम असलेल्या राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्स लि. (आरसीएफ) या आशिया खंडातील सर्वात मोठ्या आणि राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या खत निर्मिती प्रकल्पाची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या ‘सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स’(सीआयएसएफ) नियंत्रण कक्षास शुक्रवारी संध्याकाळी ५.३० वाजता एक संदेश आला...‘हॅलो कंट्रोलरूम... आपल्या आरसीएफ कंपनी क्षेत्राच्या कुंपणावरून चार अतिरेकी घुसले आहेत... अ‍ॅक्शन’अतिरेकी कारखाना क्षेत्रात घुसल्याच्या अचानक आलेल्या या संदेशामुळे काही क्षण सीआयएसएफ कंट्रोलरूममध्ये एकदम सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले. सीआयएसएफ कंट्रोलरूम प्रमुखाने सीआयएसएफ आरसीएफ थळ युनिटप्रमुख डेप्युटी कमांडर प्रसाद अवधेशकुमार यांनी या गंभीर संदेशाची तत्काळ माहिती दिली. त्याच क्षणाला डेप्युटी कमांडर प्रसाद अवधेशकुमार यांनी तत्काळ आपत्कालीन परिस्थिती निवारण योजना अमलात आणली.सत्त्वर रायगड पोलीस दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला या आपत्कालीन परिस्थितीची माहिती वायरलेस, मोबाइल आणि लॅण्डलाइन फोन्सवरून देण्यात आली. परिस्थितीचे गाभीर्य तत्काळ विचारात घेऊन दुसºयाच क्षणाला रायगड पोलीस बॉम्ब निकामीकरण पथक(बीडीडीएस) आणि रायगड पोलीस क्विक रिस्पॉन्स टिम(क्यूआरटी) यांना वायरलेसवरून अतितत्काळतेचा संदेश देण्यात आला आणि काही क्षणांतच रायगड पोलीस बीडीडीएस, डॉगस्कॉड आणि रायगड पोलीस क्यूआरटी टिम्स आरसीएफ थळ काराखान्यात दाखल होऊन सीआयएसएफ सशस्त्र कमोंडो पथकाबरोबर आपत्कालीन परिस्थिती निवारण योजनेनुसार सज्ज झाले.याच काही क्षणांच्या काळात सीआयएसएफ कंट्रोलरूमने आरसीएफ थळ अग्निशमन दल आणि आरसीएफ रुग्णवाहिका यांना अतितत्काळतेचा संदेश दिला आणि या दोन्ही यंत्रणा पुढील काही मिनिटांत आपत्कालीन परिस्थिती निवारण योजनेनुसार सज्ज झाल्या. त्याच वेळी आरसीएफ व्यवस्थापनास या गंभीर परिस्थितीबाबत कल्पना देण्यात आली.सीआयएसएफ व्हीजिलन्स पथकाने संदेश मिळाल्यापासून केवळ १५ मिनिटांत म्हणजे ५.४५ वाजता कंपनी क्षेत्रात घुसलेले अतिरेकी नेमके कुठे आहेत हे शोधून काढण्यात यश मिळविले. ‘हे अतिरेकी आधुनिक शस्त्रधारी आरसीएफ थळ कारखाना क्षेत्रातील राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्ट्रीने अत्यंत संवेदनशील अशा ‘हेवी वॉटर प्लॅन्ट’च्या कंट्रोलरूममध्ये पोहोचले असून, त्यांनी तेथील काही अभियंत्यांना ओलीस ठेवले आहे.’अशी माहिती व्हीजिल पथकाने उपलब्ध करून दिली आणि प्रसंगाचे गांभीर्य अधीकच वाढले. अतिरेकी हेवी वॉटर प्लॅन्टच्या कंट्रोलरूम मध्ये असल्याचे समजल्याने या प्लॅन्टचे प्रमुख महाव्यवस्थापक मिलिंद देव यांना याबाबतची माहिती देऊन त्यांना सतर्क करण्यात आले.एका तासात रेस्कू आॅपरेशन यशस्वीनेमके अतिरेकी कोण हे काही सेकंदात ओळखून त्यांना मोठ्या कौशल्याने जेरबंद करण्यात सीआयएसएफ कमांडोंना यश आले. अतिरेक्यांना निशस्त्र करून कंट्रोलरूमच्या बाहेर आणून कंट्रोलरूममधील अभियंत्यांना ओलिस मुक्त करण्यात आले आणि अतिरेक्यांचा मुकाबला करण्याचे हे रेस्कू आॅपरेशन यशस्वी करून मॉकड्रिल ६.३० वाजता पूर्ण झाली.रेस्क्यू आॅपरेशनचे नियोजनसीआयएसएफ डेप्युटी कमांडर प्रसाद अवधेशकुमार यांनी पुढील काही क्षणातच, नेमका अ‍ॅक्शन प्लॅन काय असेल, कोणी कोणती जबाबदारी निभावायची, फायरिंग करण्याची वेळ आलीच तर कोणत्या प्रकारे कोणी आणि कधी फायरिंग करायचे, या बाबतची अंतिम कार्यवाही अर्थात रेस्क्यू आॅपरेशनचे नियोजन सीआयएसएफ सशस्त्र कमोंडो टिम, रायगड पोलीस बीडीडीएस, रायगड पोलीस क्यूआरटी, आरसीएफ थळ अग्निशमन दल आणि आरसीएफ रुग्णवाहिका यांना स्पष्टपणे समजावून सांगितले.सशस्त्र कमोंडो आणि क्यूआरटी जवानांचा घेरावअतिरेक्यांना कोणत्याही प्रकारे कोणतीही कल्पना येणार नाही याची सारी दक्षता घेऊन, सीआयएसएफ सशस्त्र कमोंडो आणि रायगड पोलीस क्यूआरटी जवानांनी अतिरेकी घुसलेल्या ‘हेवी वॉटर प्लॅन्ट कंट्रोलरूम’ला चारही बाजूने घेरले. काही क्षणाचा श्वास घेऊन, चार सक्षस्त्र सीआयएसएफ कमांडो जवानांनी जमीन आणि पायºयांवरून रांगत जाऊन हेवी वॉटर कंट्रोलरूममध्ये मोठ्या शिताफीने प्रवेश मिळविला. त्याच सुमारास रायगड पोलीस बॉम्ब निकामीकरण पथक(बीडीडीएस)चे जवान व तंत्रज्ञानाने या कंट्रोलरूममध्ये अत्यंत सावधानतेने प्रवेश मिळविला.

टॅग्स :Raigadरायगड